Lok Sabha Election 2024 : अखिलेश लालूंना देणार धक्का? जावयाच्या तिकिटावर टांगती तलवार

Tej Pratap Yadav News : तेजप्रताप यादव हे लालूंच्या कन्या राजलक्ष्मी यांचे पती आहेत. त्यांना कनौज मतदारसंघातून सपाने उमेदवारी जाहीर केली आहे.
Tej Pratap Yadav, Akhilesh Yadav
Tej Pratap Yadav, Akhilesh YadavSarkarnama
Published on
Updated on

Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024) वारे जोरात वाहत असताना समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना धक्का देऊ शकतात. अखिलेश यांनी लालूंच्या जावयाला यूपीतील कन्नौज लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. पण त्यावरून सपाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. अखिलेश यांनी निर्णय घेण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून 24 तासांचा वेळ मागितल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.

तेजप्रताप यादव (Taj Pratap Yadav) हे लालूंच्या कन्या राजलक्ष्मी यांचे पती आहेत. तसेच माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांचे मोठे बंधू रतन सिंह यादव यांच्या मुलीचे पुत्र आहेत. मागील वीस वर्षांपासून ते उत्तर प्रदेशातील राजकारणात सक्रिय आहेत. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मैनपुरी मतदारसंघाचे 2014 ते 2019 या कालावधीत ते खासदार होते.

Tej Pratap Yadav, Akhilesh Yadav
Lok Sabha Election 2024 : तेजस्वी यादवांवर नितीश कुमारांच्या उमेदवारासाठी मतं मागण्याची वेळ

अखिलेश (Akhilesh Yadav) हे कनौज मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढणार असल्याची जोरदार चर्चा होती. पण त्यांनी आपले भाचे तेजप्रताप यांना उमेदवारी जाहीर केली. यावरून आता सपामध्ये नाराजी निर्माण झाली आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला असून, प्रचारातही सहभागी होणार नसल्याचा इशारा दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अखिलेश यांनाच उभे राहण्यासाठी साकडे घातले आहे. त्याला अखिलेश यांनीही थेट नकार दिलेला नाही. उमेदवारीबाबत निर्णय घेण्यासाठी त्यांनी 24 तासांची वेळ मागितली आहे. त्यामुळे तेज प्रताप यांचा पत्ता कट होऊ शकतो, अशी चर्चा आहे. या मतदारसंघातून अखिलेश स्वत: उमेदवार असतील, असे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

दरम्यान, तेज प्रताप यादव यांचे वडील उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध सैफई महोत्सवाचे संस्थापक होते. त्यांची आई सैफई ब्लॉक प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांचा राजकारणातही चांगला दबदबा आहे. तेज प्रताप यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून अखिलेश यांनी बिहारमध्ये लालूंनाही संदेश दिला आहे. त्यामुळे बिहार आणि उत्तर प्रदेशात या दोन्ही राज्यांत आरजेडी आणि सपाची एकमेकांच्या उमेदवारांना मदत करू शकतात, अशी चर्चा आहे. मात्र, त्यांचे तिकीट कापल्यास त्याचा उलट परिणाम होण्याची शक्यता आहे.

R

Tej Pratap Yadav, Akhilesh Yadav
Nilesh Kumbhani News : बिनविरोध विजयाची स्क्रिप्ट आधीच होती तयार? कुंभानी भाजपमध्ये जाण्याची चर्चा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com