Sushma Andhare News : 'मिस्टर राज, मी तुमच्यासारखी 'सुपारी' घेणारी नाही' ; अंधारेंची बोचरी टीका!

Lok Sabha Election 2024 : शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांची अक्षरशा पिसे काढली
Sushma Andhare News
Sushma Andhare NewsSarkarnama

Nashik News : महाविकास आघाडी पुरस्कृत शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी काल सभा झाली. या सभेत शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टिकेवर अक्षरश: त्यांची पिसे काढली. अगदी रमेश किणी ते नरेंद्र मोदींचा प्रचार असा ३० वर्षांचा सगळा हिशेबच मांडला. (Latest Marathi News)

शिवसेना नेत्या अंधारे यांची रविवारी नाशिक येथील देवळाली कॅम्प येथे सभा झाली. ही सभा अंधारे यांनी राज ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांचा समाचार घेत गाजवली. त्याला ठाणे येथे राज ठाकरे यांनी आपल्या सभेत दाखविलेल्या अंधारे यांचा व्हिडिओची पार्श्वभूमी होती. त्यामुळे संतापलेल्या अंधारे यांनी राज ठाकरे यांची अक्षरश: पिसे काढली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सुषमा अंधारे म्हणाल्या, "भाजपाला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्यांनी बेरोजगारांच्या प्रश्नांचा व्हिडिओ का नाही दाखवला?. शेतकऱ्यांचे प्रश्न तीव्र झाले आहेत. कांदा निर्यात बंदी झाली आहे. त्याचा व्हिडिओ का दाखवला नाही? गेल्या दहा वर्षात पंतप्रधान मोदी यांच्या राज्यात महिलांची सुरक्षितता संकटात आली. त्याचा व्हिडिओ कधी दाखवणार? माझा व्हिडिओ दाखवण्यापेक्षा गरिबांच्या मुलांच्या शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. तो व्हिडिओ दाखवाल का?" असा प्रश्न केला.

Sushma Andhare News
Raj Thackeray : राज ठाकरेंनी पुन्हा घातला परप्रांतियांच्या मुद्द्याला हात; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंना मोठा सल्ला

अंधारे यांनी राज ठाकरे यांचा सगळा इतिहासच मांडला. 'आल्या दुपारी बारा वाजता उठायचे आणि लोकांच्या सुपाऱ्या घ्यायच्या हे ज्यांनी राज ठाकरे यांना हिणवले, त्यांच्याच प्रचारासाठी काल ठाकरे यांनी ठाण्यात सभा घेतली. याच्यापेक्षा मोठे दुर्दैव काय असू शकते. 'उठ दुपारी आणि घे सुपारी' असे राज ठाकरे यांना आजवर याच लोकांनी हिणवले होते, याचे स्मरण अंधारे यांनी करून दिले.

"मिस्टर राज, मी तुमच्यासारख्या सुपाऱ्या घेत नाही. त्यामुळे माझ्याविषयी जरा जपून बोला. मी ग्रामीण भागातली आणि गरीब कुटुंबातली आहे. मी चक्रवाढ व्याजासह सगळ्याची परतफेड करते. याची जाणीव ठेवा," असा सज्जड दमच अंधारे यांनी भरला. 'राज ठाकरे सध्या भाजप आणि त्यांच्या जमवलेल्या गर्दीचा प्रचार करीत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणण्यासाठी जमलेल्या कळपाचे समर्थन राज ठाकरे करीत आहे. मात्र लक्षात ठेवा कळप लांडग्यांचा असतो वाघीण एकटीच येत, असेही त्या म्हणाल्या.

Sushma Andhare News
Raj Thackeray : ...अन् राज ठाकरेंनी पुन्हा एकदा म्हटलंच 'लावरे तो व्हिडिओ' ; उद्धव ठाकरेंना सुनावले खडेबोल!

"ते मोदींना (Narendra Modi) पंतप्रधान करण्यासाठी मते मागत आहेत. मात्र मोदींना का पंतप्रधान करायचे? याचे उत्तर त्यांच्याकडे आहे का?. पंजाबचे शेतकरी आंदोलनाला गेल्यावर रस्त्यांवर खेळ ठोकणारे, महिला खेळाडूंना छळणाऱ्या ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलांना उमेदवारी देणाऱ्या, शेकडो महिलांचा विनयभंग आणि छळ करणाऱ्या प्रज्वल रेवणा यांना सुरक्षित जर्मनीला पाठवणाऱ्या मोदींना पंतप्रधान करायचे आहे का?" असा प्रश्न त्यांनी केला.

Sushma Andhare News
Pune Bjp News : धंगेकरांची स्टंटबाजी थांबवा; भाजपच्या शिष्टमंडळाने घेतली पोलिस आयुक्तांची भेट

यावेळी अंधारे यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या रमेश किणी खून प्रकरण, कोहिनूर मिल घोटाळा अशा विविध प्रकरणांचा उल्लेख केला तुम्ही मला उगीच डिवचण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा माझ्याकडे देखील भरपूर व्हिडिओ आणि सीडी आहेत, असा इशाराच त्यांनी दिला. पाऊण तासाच्या या भाषणात त्यांनी राज ठाकरे यांची अक्षरश: पिसे काढत समाचार घेतला. यावेळी उमेदवार राजाभाऊ वाजे, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, केशव पोरजे, माजी आमदार योगेश घोलप, महानगर प्रमुख विलास शिंदे, रतन चावला, पोपटराव जाधव आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com