Thane Political News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. यावेळी त्यांनी आपल्या जुन्या स्टाईलमध्ये लावरे तो व्हिडीओ म्हणत उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.
राज ठाकरे म्हणाले, तुम्ही म्हणता ना, माझे वडील चोरले- माझे वडील चोरले ज्या वडिलांबद्दल एवढं प्रेम आहे, मी एकच क्लिप तुम्हाला दाखवायला आणली आहे. मी खरंतर मागच्या त्या सभांमध्ये एकदाच बोललो होतो लावरे तो व्हिडीओ, तर सर्वांनी तेच सुरूच केलं. पण आता सांगतोय लावरे तो व्हिडिओ, असं म्हणत राज ठाकरेंनी(Raj Thackeray) सुषमा अंधारेंच्या एका जुन्या भाषणाचा व्हिडीओ लावयला सांगितला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
'शालिनी पाटील किंवा बाळासाहेब ठाकरेंच्या हातात हातात, ८०-८५ वर्षांच्या म्हाताऱ्याच्या हातात तलावर देऊन काय उपयोग होणार आहे? हात थरथर करताय आणि त्या हातात तलवार अन् तरणीबांड पोरं काय गोट्या खेळायला लागलीत काय? गल्लीत गिल्ली दंडा खेळायला लागलीत काय? याच्यावर अग्रलेख कधीच होत नाही.' असं सुषमा अंधारे(Sushma Andhare) त्या व्हिडीओत बोलताना दिसत आहेत.
याशिवाय 'यांच्या अनेक क्लिप्स आहेत, मला त्यांच्या क्लिप्सचं काही घेणंदेणं नाही. पण माननीय बाळासाहेबांबत वक्तव्य करणाऱ्या या बाई 70-80 वर्षांच्या म्हाताऱ्याच्या हातात तलावर दिल्यानंतर लटलटणारा हा हात, असं बोलणाऱ्या या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाची प्रवक्ती करता, पक्षाच्या नेत्या करतात आणि तुम्ही तुमच्या वडिलांवर प्रेम आहे हे सांगतात?' असा सवालही राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना उद्देशून केला.
याचबरोबर 'ज्या छगन भुजबळांना बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्याचा प्रयत्न केला होता. त्या छगन भुजबळांबरोबर(Chhagan Bhujbal) तुम्ही भाजपासून फारकत घेतल्यानतंर मंत्रीमंडळात तुम्ही मांडीला मांडी लावून बसतात. तेव्हा वाटलं नाही का, माझ्या वडिलांना अटक करायला लावणाऱ्या या माणसाबरोबर मी बसणार नाही आणि कसलं फोडोफोडीचं राजकारण तुम्ही सांगता आहात?' असंही राज ठाकरेंनी बोलून दाखवलं.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.