Lok Sabha Election 2024 : दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या मतदान; राज्यातील 8 जागांसह देशभरातील 88 जागांचा 'फैसला' होणार...

Voting tomorrow for second phase 88 seats : राहुल गांधी, शशी थरुर, ओम बिर्ला यांची प्रतिष्ठा पणाला..
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Sarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha News : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यांतील 88 लोकसभा मतदारसंघांत मतदान होणार आहे. या टप्प्यात उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी 8 जागांसाठी आणि बिहारमधील 5 जागांसाठी मतदान होणार आहे. केरळमधील सर्व 20, कर्नाटकातील 14, राजस्थानमधील 13, मध्य प्रदेशातील 6, आसाममधील 5, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडमधील प्रत्येकी 3, मणिपूर, त्रिपुरा आणि जम्मू-काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशातील प्रत्येकी 1 जागांवर दुसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. या टप्प्यात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींपासून ते लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यापर्यंत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. (Latest Marathi News)

राज्यातील कोणत्या आठ जागांवर मतदान?

महाराष्ट्र राज्यातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या लोकसभा मतदारसंघांत उद्या 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची काल अमरावतीत, तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची परतवाडा व सोलापूरमध्ये सभा पार पडली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Lok Sabha Election 2024
Maval Lok Sabha: मावळ लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार? 'वंचित'कडून उमेदवारी अर्ज दाखल

दुसऱ्या टप्प्यातील हायव्होल्टेज जागा -

दुसऱ्या टप्प्यात ज्या 88 जागांसाठी मतदान होणार आहे, त्यापैकी काही जागा काही विशेष राजकीय घडामोडींमुळे चर्चेत आहेत, तर काही बड्या नेत्यांनी निवडणूक लढविल्यामुळे या जागांवर हायव्होल्टेज अशी लढत आहे. यामुळे दुसऱ्या टप्प्यासाठी आता प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे.

Lok Sabha Election 2024
Fire In BJP office Mumbai : मोठी बातमी! मुंबईच्या भाजप कार्यालयात आगीचं थैमान; भीषण दुर्घटना...
Lok Sabha Election 2024
Sharad Pawar NCP Manifesto 2024: स्पर्धा परीक्षांची फी माफ करणार, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 'गॅरंटी'

देशभरातील कोणत्या चर्चेतल्या जागा ?

आऊटर मणिपूर- हिंसाचारामुळे चर्चेत असलेल्या मणिपूरच्या आऊटर मणिपूर जागेसाठी दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

वायनाड- राहुल गांधी केरळच्या वायनाडमधून निवडणूक लढवत आहेत. या जागेवरून डाव्यांनी ॲनी राजा यांना, तर भाजपने के सुरेंद्रन यांना उमेदवारी दिली आहे.

कोटा- लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला भाजपच्या तिकिटावर कोटा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ओम बिर्ला यांच्यासमोर भाजपला राम राम ठोकून काँग्रेस पक्षात दाखल झालेल्या प्रल्हाद गुंजाळ यांना काँग्रेसने तिकीट दिले आहे.

मेरठ- अरुण गोविल उत्तर प्रदेशातील मेरठमधून उमेदवारी केल्यामुळे चर्चेत आहेत. भाजपने रामायण मालिकेतील राम पात्र साकारणारे अरुण गोविल यांना मेरठमधून उमेदवारी दिली आहे.

पूर्णिया- पप्पू यादव बिहारच्या पूर्णिया मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. पप्पू यादव हे काँग्रेसकडून तिकिटासाठी उमेदवार होते, पण राजदने या जागेवरून आपला उमेदवार उभा केला.

खजुराहो- मध्य प्रदेश भाजपचे अध्यक्ष व्ही. डी. शर्मा खजुराहो मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत, परंतु ही जागा इंडिया आघाडीचे उमेदवाराने अर्ज नाकारल्यामुळे चर्चेत राहिली आहे.

बंगळुरू ग्रामीण- बंगळुरू ग्रामीण मतदारसंघातून माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचे जावई सी.एन. मंजुनाथ यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचे भाऊ डी.के. सुरेश यांच्या विरोधात भाजपने सी.एन. मंजुनाथ यांना तिकीट दिले आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com