Mumbai News : मुंबईतील नरिमन पॉईंटजवळच्या भाजप कार्यालयाला आग लागल्याची माहिती समोर येत आहे. या आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. या ठिकाणी आता अग्निशमनच्या दलाच्या गाड्या पोहचलेल्या आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार वेल्डींगचं काम या कार्यालयात सुरु होते. शाॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागली असल्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)
मुंबईतील नरिमन पॉईंटजवळच्या भाजप कार्यालयाला आग लागल्याची माहिती समोर येत आहे. या आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. या ठिकाणी आता अग्निशमनच्या दलाच्या गाड्या पोहचलेल्या आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक माहिती नुसार वेल्डींगचं काम या कार्यालयात सुरु होते. शाॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागली असल्याची शक्यता आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भाजपच्या कार्यालयात किचनच्या एरियात वेल्डिंगचं काम सुरु होतं. अचानक शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागली असण्याची शक्यता आहे. एकीकडे निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच ही आग लागल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मुंबई (Mumbai) येथील नरीमन पॉईंटमधील भाजप प्रदेश कार्यालयाला आग लागल्यामुळे येथील पक्षाचे आणि मोदींचे फलक हटवण्यात आले आहे. दरम्यान या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
आज रविवार सु्ट्टीचा दिवस असल्याने कार्यालयात कुणीही उपस्थित नव्हते. मात्र कार्यालययाच्या मागच्या बाजूला भाजप (BJP) सोशल मीडिया हॅण्डल करणारे काही कार्यकर्ते होते. आग लागल्यानंतर त्यांना तातडीने तेथून काढण्यात आले. नरिमन पाँईंट हा हायप्रोफाईल लोकांचा भाग आहे. यामुळे येथे आगीच्या घटनेने परिसरात खळबळ माजली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.