Congress
CongressSarkarnama

Lok Sabha Election News : निवडणुकीत पहिल्यांदाच काँग्रेसचे असे हाल; ‘इंडिया आघाडी’मुळे आली वेळ

Congress News : इंडिया आघाडीमुळे अनेक राज्यांमध्ये काँग्रेसचे मित्रपक्ष सर्वाधिक जागांवर निवडणूक लढत आहेत. त्यामुळे पक्षाला जागावाटपात पदरात पडलेल्या जागांवर समाधान मानून घ्यावे लागले आहे.
Published on

New Delhi News : देशातील सर्वात जुनी आणि सर्वाधिक काळ सत्तेत असलेल्या काँग्रेससाठी 2024 ची लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election News) महत्त्वाची मानली जात आहे. भाजपची सत्ता उलथवून टाकण्यासाठी काँग्रेसने इंडिया आघाडीला जन्म दिला. पण त्याचा फटका पक्षालाच बसला आहे. लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेस 400 पेक्षा कमी जागांवर लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) झंझावातामुळे 2014 पासून काँग्रेसची वाताहात झाली आहे. पक्षाला 2014 मध्ये पहिल्यांदाच 100 पेक्षा कमी म्हणजे केवळ 44 जागा मिळाल्या. त्यानंतर 2019 मध्येही केवळ 52 जागांवर समाधान मानावे लागले. या दोन्ही निवडणुकीत काँग्रेसने (Congress) 400 हून अधिक उमेदवार रिंगणात उतरवले होते.

Congress
Kanhaiya Kumar News : काँग्रेसकडून कन्हैया कुमारला लोकसभेची उमेदवारी, 'या' बड्या नेत्याशी होणार लढत

2024 च्या निवडणुकीसाठी (Election) काँग्रेसने आतापर्यंत 266 उमेदवार जाहीर केले आहेत. हा आकडा फारतर 340-350 पर्यंत वाढू शकतो. असे झाले तर पहिल्यांदाच काँग्रेस 400 हून कमी लोकसभा जागांवर निवडणूक लढेल. इंडिया आघाडीमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र (Maharashtra Politics), तमिळनाडू, हरियाणा आदी राज्यांमध्ये मित्रपक्षांना अधिक जागा मिळाल्या आहेत. परिणामी, काँग्रेसच्या वाट्याला कमी जागा आल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सर्वाधिक उमेदवार 1996 मध्ये

काँग्रेसने 1952 पासून 2019 च्या निवडणुकीपर्यंत सर्वाधिक 529 उमेदवार 1996 च्या निवडणुकीत उतरवले होते. त्यावेळी पक्षाला केवळ 140 जागांवर विजय मिळाला होता. 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसने 463 तर 2019 मध्ये 421 मतदारसंघात उमेदवार दिले होते. अनुक्रमे 44 आणि 52 जागांवर विजय मिळाला होता.

उत्तर प्रदेशात मागील निवडणुकीत काँग्रेस 67 जागांवर उमेदवार उतरवले होते. या वेळी पक्षाला केवळ 17 जागा मिळाल्या आहेत. पश्चिम बंगालमध्येही या वेळी काँग्रेस जेमतेम 20 जागांवर निवडणूक लढू शकते. मागील वेळी 41 उमेदवार रिंगणात होते. या वेळी उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या वाट्याला कमी जागा आल्याने पक्षावर लोकसभेच्या इतिहासात सर्वात कमी जागांवर लढण्याची वेळ आली आहे.

R

Congress
Mayawati News : उत्तर प्रदेशसाठी मायावतींची मोठी घोषणा; जाट अन् मुस्लिम मतांसाठी खेळी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com