Exit Poll Fraud
Exit Poll FraudSarkarnama

Lok Sabha Election Result Exit Poll 2024 : एक्झिट पोलचा ‘फ्रॉड’; मोदी 300 पारही नाही...

Exit Poll 2024 Lok Sbaha Election Update Modi Government : बहुतेक सर्व एक्झिट पोलने एनडीएला 360 हून अधिक जागा मिळतील, असे अंदाज वर्तवले होते. पण हे अंदाज फोल ठरताना दिसत आहेत.  

Election 2024 Update : चारसो पारचा नारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धुमधडाक्यात सुरूवात केली. त्याचे प्रतिबिंब एक्झिट पोलमध्येही उमटले. त्यामुळे हुरळून गेलेल्या भाजपला प्रत्यक्ष निकालातील कलांनी धक्का दिला आहे. एक्झिट पोलचे आकडे फोल ठरले असून एनडीए 300 पारही करणार नाही, अशीच सध्याची स्थिती आहे.

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाल्यानंतर एनडीएच्या उमेदवारांनी सुरूवातीच्या काही कलांमध्ये मोठी आघाडी घेतल्याचे दिसते होते. त्यामुळे एनडीए 400 पार करणार की काय, अशी स्थिती होती. विरोधक गारद झाले होते. तर भाजपचे नेत्यांनी जल्लोषही सुरू केला होता.

जसजशा मतमोजमीच्या फेऱ्या पुढे सरकत गेल्या तसतसे चित्र बदलत गेले अन् एक्झिट पोलचे अंदाज फोल ठरू लागले. काँग्रेससह सहकाऱ्यांनी हे एक्झिट पोल सरकारी असल्याचा आरोप सुरू केला होता. काँग्रेसने 295 जागा मिळतील, असा दावा केला होता. हा दावाही फोल ठरला असला तरी एनडीएलाही मोठा धक्का दिला आहे.

बहुतेक एक्झिट पोलचे अंदाज सपशेल फोल ठरले आहेत. यामध्ये एनडीएल 360 हून अधिक जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला होता. काही एक्झिट पोलने तर एनडीएला 400 च्या जवळ नेऊन ठेवले होते. पण प्रत्यक्षा मतमोजणीमध्ये भाजप 300 पारही जाणार की नाही, असे चित्र आहे.

इलेक्शन कमिशनच्या अधिकृत आकडेवारीनुसार, दुपारी बारा वाजता भाजपचे 234 उमेदवार आघाडीवर होते. तर काँग्रेसनेही मोठी आघाडी घेतल्याचे दिसते. काँग्रेसचे 98 तर मित्रपक्ष असलेल्या समाजवादी पक्षाचे 36 उमेदवार आघाडीवर आहेत. तृणमूल काँग्रेस आणि डीएमकेने अनुक्रमे 32 व 21 जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेस आघाडीचे जवळपास 240 उमेदवार आघाडीवर आहेत.

भाजपला उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये मोठा धक्का बसला आहे. एक्झिट पोलने या राज्यांतही भाजपला अच्छे दिन दाखवले होते. पण प्रत्यक्षात उलटफेर झाला आहे. त्याचा मोठा फटका भाजपला बसला आहे. महाराष्ट्रातही महाविकास आघाडीने मोठी आघाडी घेतली आहे. केवळ आंध्र प्रदेश आणि बिहारमध्ये एनडीएच्या मित्रपक्षांनी चांगली कामगिरी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com