
Parliament Session Live : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भाषणातील एका मुद्द्यावरून वाद निर्माण झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीसाठी निमंत्रण मिळावे, यासाठी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना अमेरिकेला पाठवले असल्याचा आरोप, राहुल यांनी केला होता. त्यावरून लोकसभेत जोरदार खड़ाजंगी झाली. यावेळी पंतप्रधान मोदीही सभागृहात उपस्थित होते.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान राहुल यांनी हे विधान केले आहे. राहुल यांनी शपथविधीवरून बोलताना म्हटले की, आपली उत्पादन प्रणाली मजबूत असती आणि आपण आधुनिक तंत्रज्ञानावर काम करत असतो तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष स्वत: भारतात येऊन पंतप्रधानांना निमंत्रित केले असते. निमंत्रणासाठी परराष्ट्र मंत्र्यांना तिथे पाठवावे लागले नसते.
केंद्रीय मंत्री जयशंकर यांनी काही मिनिटांतच राहुल गांधी यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. त्यांनी याबाबत सोशल मीडियात पोस्ट करून म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी अशाप्रकारे कोणत्याही विश्वनेत्याच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होत नाहीत. भारताचे प्रतिनिधित्व सर्वसाधारणपणे राजदूतांच्या माध्यमातून केले जाते.
तत्कालीन बायडेन सरकारमधील अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी मी अमेरिकेला गेलो होतो, असा खुलासा जयशंकर यांनी केला आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी डिसेंबर २०२४ मधील माझ्या अमेरिकेच्या भेटीवर जाणीवपूर्वक खोटे बोलले. मी बायडेन प्रशासनातील परराष्ट्र मंत्री आणि एनएसए यांना भेटायला गेलो होते, असे जयशंकर यांनी म्हटले आहे.
माझ्या भेटीदरम्यान, भावी एनएसए यांनी माझ्याशी चर्चा केली. कोणत्याही स्तरावर पंतप्रधानाच्या निमंत्रणाबाबत चर्चा झाली नाही. आपले पंतप्रधान अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होत नाहीत, हे सगळ्यांना माहिती आहे. राहुल गांधी यांच्या खोट्या दाव्याचा उद्देश राजकीय असू शकतो. पण यामुळे देशाला परदेशात नुकसान होते, असा पलटवारही जयशंकर यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.