Parliament Security Breach : लोकसभा घुसखोरी प्रकरणात लातूर कनेक्शन; अमोल शिंदेंसह तीन जण ताब्यात

Security Breach In Parliament : म्हैसूर येथील खासदार प्रताप सिंह यांच्यामार्फेत पास मिळाले असल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे.
Parliament Security Breached
Parliament Security BreachedSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Security Breach : संसदेच्या सुरक्षेत मोठी त्रुटी असल्याचा प्रकार आज दुपारी समोर आला आहे. लोकसभेचे कामकाज सुरू असताना दोन तरुण सभागृहात घुसले. या दोघांनी प्रेक्षक गॅलरीतून खासदार ज्या ठिकाणी बसतात, त्याठिकाणी उडी मारली.

लोकसभेत घुसखोरी करणाऱ्यांची नावे समोर आली आहेत. लोकसभेबाहेर स्मोक कँडल जाळणारा अमोल धनराज शिंदे हा लातूर येथील असल्याची माहिती समोर येत आहे. तर लोकसभेत घुसखोरीत करणाऱ्याचे नाव सागर असल्याची माहिती समोर येत आहे.

नीलम कौर ही संसदेच्या बाहेर सरकारच्या विरोधात घोषणा देत होती. नीलम ही हरियाणा येथील आहे. सागर शर्मा याला खासदार प्रताप सिम्हा यांच्यामार्फेत पास मिळाले असल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे.

संसदेच्या बाहेर आधी त्यांनी फटाके फोडले. यावेळी त्यांनी भारतमाता की जय, तानाशाही नही चलेगी… आदी घोषणा दिल्या. ट्रान्स्पोर्ट भवनाच्या बाहेर हा गोंधळ घालण्यात आला.

नेमकं काय झालं...

लोकसभेत शून्य प्रहाराचे कामकाज सुरु होते. तीन अज्ञात व्यक्ती अचानक सभागृहात घुसल्याने खळबळ उडाली.एकाने बुटातून काही तरी गॅस काढला, सभागृहात स्प्रे मारला. त्यामुळे उपस्थित खासदारांच्या नाकात जळजळ सुरु झाली. त्यांनी पिवळ्या रंगाचा गॅसही फोडला. त्यामुळे संसद भवन परिसर पिवळा झाला होता.

या तिन्ही व्यक्तींना सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतले आहे.अचानक प्रेक्षक गॅलरीतून तिघे जण खांबाला धरुन लटकले. त्यातील दोन जणांनी खाली उडी मारली. ते सभागृहात पळत होते. त्याचवेळी तिसऱ्या व्यक्तीने बुटातून काही तरी गॅसचा फवारा केला. सभागृहातील खासदारांच्या नाकात आणि डोळ्यात जळजळ सुरु झाली. त्यानंतर सभागृह तहकूब झाले. सुरक्षा रक्षकांनी या तिघांनाही ताब्यात घेतले आहे.

कोण आहे अमोल शिंदे

संसद परिसरात घोषणा देणारा व स्मोक कँडल जाळणारा अमोल शिंदे हा चाकूर तालुक्यातील झरी गावाचा आहे.

Parliament Security Breached
Lok Sabha Security Breach : क्या हुआ, गिर गया... पकडो पकडो पकडो! लोकसभेत घुसखोरी झाली अन्...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com