Gowal Padvi : गोवाल पाडवींनी शपथ घेताच सत्ताधारी-विरोधक भिडले! राहुल गांधींशी ‘शेक हँड’...

Lok Sabha Session 2024 Congress MP Gowal Padvi Parliament Session : 18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले. पहिल्या दिवशी 262 खासदारांनी सदस्यत्वाची शपथ घेतली आहे.
Gowal Padvi in Parliament
Gowal Padvi in ParliamentSarkarnama

New Delhi : लोकसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर महाराष्ट्रातील खासदारांपासून शपथ घेण्यास सुरूवात झाली. पहिलीच शपथ नंदूरबारचे काँग्रेसचे खासदार गोवाल पाडवी यांनी घेतली.

पाडवी यांनी शपथ घेतल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक भिडल्याचे पाहायला मिळाले. त्याला पाडवीच कारणीभूत ठरले. पाडवी शपथ घेताना एका हातात संविधानाची प्रत होती. त्यांनी हिंदीतून शपथ घेतली.

Gowal Padvi in Parliament
Lok Sabha Speaker : पहिल्याच निवडणुकीतून ‘इंडिया’ची माघार; तडजोड करण्यात भाजपला यश

शपथ घेतल्यानंतर सत्ताधारी बाकावरील एका सदस्याने आणीबाणीची आठवण करून दिली. आजच्या दिवशी 50 वर्षांपुर्वी ह्यांनीच आणीबाणी लादली होती, याची आठवण करून द्यायला हवी, असे एका सदस्याने म्हटले. त्यावर विरोधी बाकांवरील सदस्य तुटून पडले.

काही सदस्यांनी उभे राहून मागील दहा वर्षे अघोषित आणीबाणी असल्याचे सांगत निशाणा साधला. दोन मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकण्यात आले आहे. दोन्ही बाजूकडील सदस्यांनी एकमेकांवर टीका केली. केंद्रीय मंत्र्यांकडूनच सभागृहाची कामकाज विस्कळीत केले जात असल्याचे सांगत विरोधकांनी हंगामी अध्यक्षांकडे तक्रार केली.

Gowal Padvi in Parliament
50th Anniversary Of Emergency:भाजपनं काँग्रेसला करुन दिली मनोज कुमार यांच्या 'शोर'ची आठवण

शोभा बच्छाव यांच्या हातातही संविधान

गोंधळातच लोकसभा सचिवांनी काँग्रेसच्या धुळ्याच्या खासदार शोभा बच्छाव यांच्या नाव पुकारले. बच्छाव यांच्या हातातही संविधानाची प्रत होती. त्यांनी मराठीतून शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर त्यांनी शेवटी जय संविधान, जय महाराष्ट्र असा नारा दिला.

राहुल गांधींशी ‘शेक हँड’

गोपाल पाडवी शपथ घेत असतानाच काँग्रेसचे नेते राहुल गांधी सभागृहात आले. पाडवी सही करून राहुल यांच्या दिशेने गेले त्यावेळी दोघांनी शेक हँड केले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी हातात संविधानाची प्रत घेत सोमवारी संसद भवनात आंदोलन केले होते. निवडणुकीच्या प्रचारातही संविधानाचा मुद्दा गाजला होता. त्यामुळे पाडवी यांनी आज हातात संविधानाची प्रत घेऊन घेतलेल्या शपथेने सगळ्यांचेच लक्ष वेधले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com