Rahul Gandhi in Lok Sabha : है तैयार हम! राहुल गांधींनी लोकसभेतील पहिल्याच भाषणात भरला दम

Lok Sabha Session 2024 Lok Sabha Speaker Opposition Leader Rahul Gandhi : ओम बिर्ला यांची बुधवारी लोकसभेच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा निवड झाली. त्यानंतर राहुल गांधींनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
Rahul Gandhi in Lok Sabha
Rahul Gandhi in Lok SabhaSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : 18 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी भाजप खासदार ओम बिर्ला यांची बुधवारी निवड झाली. त्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बिर्ला यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी विरोधकांना आता कमजोर समजू नका, असा अप्रत्यक्षपणे सत्ताधाऱ्यांना दम भरल्याचे पाहायला मिळाले.

लोकसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडीला जवळपास 240 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे मागील दोन टर्मच्या तुलनेत विरोधकांची ताकद यावेळी चांगलीच वाढली आहे. विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर राहुल यांच्या आजच्या पहिल्याच भाषणात त्याचेच प्रतिबिंब उमटले. याबाबत त्यांनी स्पष्टपणे उल्लेखही केला.

Rahul Gandhi in Lok Sabha
Lok Sabha Speaker Election : लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची आवाजी मतदानाने निवड

राहुल गांधी यांनी सुरूवातीला बिर्ला यांना शुभेच्छा देत विरोधकांकडून संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. हे सभागृह म्हणजे देशातील जनतेचा आवाज आहे. सरकारकडे राजकीय ताकद आहे. पण विरोधकही देशातील जनतेचे प्रतिनिधित्व करत आहेत. यावेळी विरोधकांची ताकद मागच्यापेक्षा अधिक आहे, असे राहुल म्हणाले.

विरोधक तुम्हाला तुमच्या कामात मदत करू इच्छितात. सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे चालावे, असे आम्हाला वाटते. विश्वासाच्या माध्यमातून एकमेकांना सहकार्य करायला हवे, हे खूप महत्वाचे आहे. विरोधकांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळावी, हेही तितकेच महत्वाचे असल्याचे राहुल म्हणाले.

Rahul Gandhi in Lok Sabha
Lok Sabha Speaker Election : विरोधी पक्षनेतेपद मिळताच राहुल गांधी लागले कामाला; पहिला डावही यशस्वी...

मला विश्वास आहे की, तुम्ही आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी द्याल, लोकांचा आवाज मांडण्याची संधी द्याल. सभागृहाचे कामकाज किती क्षमतेने होईल, यापेक्षा सभागृहात विरोधकांचा आवाज किती ऐकला जाईल, हा खरा प्रश्न आहे. विरोधकांना गप्प करून सभागृह चालविणे, हे लोकशाहीविरोधी आहे, असा हुंकारही राहुल यांनी भरला.

विरोधकांनी संविधानाचे रक्षण करावे, असे लोकांना वाटत असल्याचे या निवडणुकीने दाखवून दिले आहे. विरोधकांना बोलण्याची संधी देऊन तुम्ही संविधानाचे रक्षण करण्याचे काम कराल, असा विश्वास व्यक्त करून राहुल यांनी आपले भाषण संपविले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com