Varsha Gaikwad : प्रवास तोच, वळण नवे..! वर्षा गायकवाड दिल्लीतही आक्रमक

Lok Sabha Session Live Parliament Congress Leader Varsha Gaikwad : मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड सोमवारी खासदार म्हणून पहिल्यांदाच संसदेत दाखल झाल्या. 
Varsha Gaikwad in Parliament
Varsha Gaikwad in ParliamentSarkarnama

New Delhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या टीममधील आक्रमक चेहरा म्हणून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांचं नाव घेतलं जाते. मुंबईकरांना त्याची अनेकदा प्रचिती आली आहे. काँग्रेसच्या या नेत्या आता दिल्लीत पोहचल्या असून पहिल्याच दिवशी त्यांची आक्रमकताही दिसून आली.

18 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला सोमवारपासून सुरूवात झाली. त्याआधी इंडिया आघाडीतील खासदारांनी संसदेच्या आवारात आंदोलन केले. या आंदोलनामध्ये मुंबईतील खासदार असलेल्या वर्षा गायकवाड यांनीही सहभाग घेतला होता. इथेही त्या आक्रमकपणे घोषणा देत होत्या. हातात संविधानाची प्रत घेऊन सरकारविरोधी नारे देत होत्या.

Varsha Gaikwad in Parliament
Praniti Shinde : संसदेच्या पायऱ्या चढताना प्रणिती शिंदे भावूक झाल्या; जुने संसद भवन हवे होते..!

वर्षा गायकवाड यांनी संसदेच्या पायऱ्यांवर माथा टेकवून नमनही केले. याविषयी सोशल मीडियावर त्यांनी  प्रवास तोच, वळण नवे, असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आजचा दिवस माझ्या आयुष्यातील एक मैलावरचा मोठा टप्पा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

काय म्हटलंय वर्षा गायकवाडांनी?

लोकनेते एकनाथराव गायकवाड यांच्या विचाराची आणि समाजसेवेची शिदोरी सोबत घेऊन 18 व्या लोकसभेची सदस्य म्हणून पदार्पण केल्याचा बहुमान मला मिळाला ही माझ्यासाठी अतिशय गौरवपूर्ण बाब आहे. संसद हे आपल्या लोकशाहीचे सर्वोच्च मंदिर असून महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वसामान्य, गोरगरीब जनतेला सर्वाधिकार देण्याच्या स्वप्नाचा मी एक घटक बनलेय यासाठी कृतज्ञ आहे, अशा भावना गायकवाड यांनी व्यक्त केल्या आहेत.

Varsha Gaikwad in Parliament
Narendra Modi Vs Rahul Gandhi : राहुल गांधींनी पहिल्या 7 मिनिटांतच मोदींविरोधात टाकला डाव! काय घडलं लोकसभेत?

 ज्या सभागृहाच्या कामकाजातून आजवर हा आपला देश घडत आला आहे, त्या संसदेचा एक भाग बनणे, माझ्यासाठी याहून मोठा कोणताही सन्मान नाही. मी संविधान तसेच माझ्याआधी या संसदेचा भाग बनलेल्या त्या तमाम मान्यवरांच्या दूरदृष्टी आणि बलिदानाला नमन करते, ज्यांनी या राष्ट्राला आकार दिला आणि आपण जगातील सर्वात मोठा लोकशाही राष्ट्र बनू याकरिता महत्त्वपूर्ण भूमिका निभावली, असे गायकवाड यांनी म्हटले आहे.

मी जनतेची सेवा करण्यास आणि लोकशाहीच्या सर्वोच्च तत्त्वांचे पालन करण्यास व ते अबाधित ठेवण्यास सदैव तत्पर राहीन. ही संधी मिळणे हे माझे भाग्यच आहे. मी देशाच्या निस्वार्थ सेवेच्या मार्गावर चालण्याचे आणि लोकशाहीच्या सर्वोच्च आदर्शांचे पालन करण्याचे वचन देते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com