Lok Sabha Session : संयमी अश्विनी वैष्णव यांचा लोकसभेत भडका; विरोधकाचा प्रचंड गदारोळ  

Railway Minister Ashwini Vaishnaw Union Budget 2024 : अर्थसंकल्पात रेल्वेला मिळालेला निधी, विविध योजना, तसेच सद्यस्थितीबाबत अश्विनी वैष्णव यांनी गुरूवारी लोकसभेत माहिती दिली.
Ashwini Vaishnaw in Lok Sabha
Ashwini Vaishnaw in Lok SabhaSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : मोदी सरकारमधील अत्यंत संयमी मंत्री म्हणून रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची ओळख आहे. माजी सनदी अधिकारी असलेल्या अश्विनी वैष्णव यांचा गुरूवारी मात्र चांगलाच भडका उडाला. लोकसभेत विरोधकांकडून सातत्याने होत असलेल्या टीकेला उत्तर देताना ते चांगलेच संतापले.

अर्थसंकल्पावर चर्चेदरम्यान विरोधी पक्षातील अनेक सदस्यांनी रेल्वे मंत्र्यांवर टीका केली होती. मागील काही महिन्यांत झालेल्या रेल्वे अपघातांवरून ते सातत्याने टीकेचे धनी होत असून त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली जात आहे. या टीकेला वैष्णव यांनी गुरूवारी प्रत्युत्तर दिले.

Ashwini Vaishnaw in Lok Sabha
Rajya Sabha Session : खासदार, आमदारकीची निवडणूक लढण्याचे वय कमी होणार? संसदेत आला विषय...

लोको पायलटला दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती देत असताना विरोधकांचा हंगामा सुरू होता. हे पाहून वैष्णव चांगलेच संतापले. आम्ही केवळ रील बनवणारे नाही, काम करणारे लोक आहोत. जे लोक इथं ओरडत आहेत, त्यांनी सत्तेत असताना मागील 58 वर्षात एक किलोमीटर तरी ऑटोमेटिक ट्रेन प्रोटेक्शन का लावले नाही, असा सवाल वैष्णव यांनी केला.

काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीत लोको पायलटची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. त्यावरूनही बराच वाद झाला होता. वैष्णव यांनी यावरून थेट राहुल यांच्या हल्ला केल्याने काँग्रेसचे खासदार चांगलेच चिडले.

Ashwini Vaishnaw in Lok Sabha
Rajya Sabha Session : खासदार, आमदारकीची निवडणूक लढण्याचे वय कमी होणार? संसदेत आला विषय...

विरोधक शांत होत नसल्याचे पाहून वैष्णव पुन्हा संतापले. गप्प खाली बसा, काहीही बोलतात. ही काय पध्दत आहे का, मध्येच काहीही बोलत आहेत, असे वैष्णव म्हणाले. त्यानंतर वैष्णव यांनी पुढे बोलायला सुरूवात केली. पण त्यांच्या रीलच्या विधानावरून विरोधकांनी रील मिनिस्टर असे म्हणत जोरदार घोषणाबाजी सुरू केली आणि सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला.

दरम्यान, आपल्या भाषणादरम्यान रेल्वे मंत्र्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. लोकसभा अध्यक्षांकडे पाहून ते म्हणाले, देश असा चालणार आहे का? काँग्रेसच्या सोशल मीडियाची ट्रोल आर्मी खोटं पसरवत आहे. अयोध्येत स्टेशनची एक जूनी भिंत पडली. त्यानंतर समाजवादी पार्टी आणि काँग्रेसच्या हँडलवरून ते व्हायरल करण्यात आले. अशाप्रकारे खोटी माहिती पसरवरून देश चालणार नाही. दोन कोटी प्रवासी रोज प्रवास करतात. त्यांच्या मनात भीती निर्माण केली जात असल्याचे वैष्णव म्हणाले.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com