Lok Sabha Session : मंत्री नड्डांनी लोकसभेत भाजप खासदाराला सुनावलं! नेमकं काय घडलं?

JP Nadda Nishikant Dubey BJP : खासदार निशीकांत दुबे यांनी यांनी एम्समध्ये ओपीडी सुरू करण्याबाबत मागणी केली होती.
JP Nadda
JP NaddaSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : लोकसभेत शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी भाजपचे खासदार निशीकांत दुबे यांची बोलती बंद केली. दुबे यांनी एम्समध्ये इमर्जन्सीसह ओपीडी सुविधा सुरू करण्याची मागणी सभागृहात केली होती. पण त्यावर उत्तर देताना नड्डा यांनी तुम्हाला जिल्हा रुग्णालय हवे की एम्स, असा सवाल करत त्यांना सुनावलं.  

झारखंडमधील देवघर येथील एम्समधील ओपीडीमध्ये कमी रुग्ण आढळून आले. त्यामुळे इर्मजन्सीसोबत ओपीडीची सुविधी कधीपर्यंत सुरू होणार, असा प्रश्न दुबे यांनी उपस्थित केला होता. त्यावर नड्डा यांनी उत्तर देताना नाराजी व्यक्त केली. तुम्हाला जिल्हा रुग्णालये हवीत की एम्स, असा सवाल करत त्यांनी सभागृहातील इतर सदस्यांनाही सल्ला दिला.

JP Nadda
Pooja Khedkar : पूजा खेडकर यांना UPSC मध्ये कुणी मदत केली? दिल्ली पोलिसांचा शोध अन्..!

नड्डा म्हणाले, देशातील कानाकोपऱ्यातील लोक उपचारासाठी दिल्लीत येऊ नयेत, त्यासाठी ठिकठिकाणी एम्सची उभारणी केली जात आहे. दिल्लीप्रमाणे तिथेही उपचार व्हावेत, ही यामागची कल्पना आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी 17 हून अधिक एम्स देशात सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे.

एम्ससाठी 1200 ते 2 हजार कोटी खर्च येतो. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. दिल्लीत 1950 मध्ये एम्स झाले होते. त्याला 70-80 मध्ये लोकांची पसंती मिळू लागली. कोणतीही संस्था एका दिवसात उभी राहत आहे. त्यामुळे तुम्हा जिल्हा रुग्णालय हवे की एम्स? एम्स हवे असेल तर त्याचे मापदंड खूप वेगळे आहेत. ते जिल्हा रुग्णालयाप्रमाणे नसतात, असे नड्डा यांनी स्पष्ट केले.

JP Nadda
Rahul Gandhi : राहुल गांधी 'चक्रव्यूहा'त? मध्यरात्री 1 वाजून 52 मिनिटांनी 'ईडी'बाबत खळबळजनक दावा

एम्समध्ये 24 तास डॉक्टर रुग्णांची सेवा करत असतात. प्रत्येक रुग्णामागे मोठा खर्च केला जातो. जिल्हा रुग्णालयात असे होत नाही. देवघरला एम्स मिळाल्यानंतर निशीकांत दुबे खूष झाले होते. त्यांची चिंता मी समजू शकतो. पण सगळीकडे हीच समस्या आहे. त्या दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण त्यासाठी 10 ते 12 वर्ष जावी लागणार असल्याचे नड्डा यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com