Goa BJP : दक्षिण गोव्यात भाजपची पिछेहाट का? पल्लवी धेंपेंच्या पराभवानंतर आत्मचिंतन सुरु

BJPs Pallavi Dhempe Defeated in South Goa Constituency : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पल्लवी धेंपे यांना उमेदवारी दिली असतानाही या जागेवर पराभवाचा सामना का करावा लागला? याची कारणमीमांसा भाजपकडून केली जाणार आहे.
Pallavi Dhempe
Pallavi DhempeSarkarnama

Goa News, 6 June : भाजपसाठी यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल धक्कादायक आहे. 'अब की बार चारसो पार'चा नारा दिलेल्या भाजपला तीनशेचा आकडाही पार करता आलेला नाही. अनेक मतदारसंघात भाजपला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशीच एक दक्षिण गोव्याची जागा भाजपला गमवावी लागली आहे.

40 पैकी 33 आमदारांचा भक्कम पाठिंबा असतानाही गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांवर भाजपचा पराभव झाला आहे. दक्षिण गोव्याची जागा 14 हजार 703 इतक्या मतांनी गमवावी लागल्यानंतर भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पल्लवी धेंपे यांना उमेदवारी दिली असतानाही या जागेवर पराभवाचा सामना का करावा लागला? याची कारणमीमांसा भाजपकडून केली जाणार आहे. यासाठी चिंतन बैठकीचेही आयोजन केले जाणार असल्याची माहिती आहे.

काँग्रेसला सासष्टीतून 61,850 मतांची आघाडी मिळाली, तर उर्वरित अकरा मतदारसंघांतून भाजपला केवळ 52,255 मतांची आघाडी मिळाली आहे. त्यामुळे सासष्टीत मिळालेल्या आघाडीच्या आधारे काँग्रेसचे उमेदवार कॅप्टन विरियातो यांचा विजय सोपा झाला.

काणकोणमध्ये माजी आमदार विजय पै खोत, माजी उपसभापती इजिदोर फर्नांडिस आणि सभापती रमेश तवडकर यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. मात्र तरीही या भागातून अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही.

केपेतून काँग्रेसचे मताधिक्य कमी करण्यात माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांना अपयश आले. तर दाबोळीतून मंत्री माविन गुदिन्हो, वास्कोतून दाजी साळकर व मुरगावमधून मिलींद नाईक, आमदार आमोणकर हे देखील भाजपला बळ देऊ शकले नाहीत. कुठ्ठाळीचे आमदार आंतोन वाझ भाजपसोबत असून गिरीश पिल्लई, रमाकांत बोरकर यांना भाजपमध्ये आणूनही तेथे काँग्रेसला रोखता आलं नाही.

Pallavi Dhempe
Hatkanangale Election Result 2024 : आजी-माजी आमदारांमुळेच हातकणंगलेत सत्यजित पाटलांचा झाला 'गेम'; विधानसभेची वाट बिकट

मडगाववर कामत यांची पकड असूनही भाजपला मोठे मताधिक्य मिळालं नसल्याचं पाहायला मिळालं. तर सावर्डे, कुडचडे, शिरोडा, फोंडा मतदारसंघातही म्हणावी अशी कामगिरी झाली नाही. मडकई वगळता इतर मतदारसंघात मताधिक्य मिळवून देण्यात आलेले अपयश भाजपच्या पराभवाला कारणीभूत ठरले असून या सगळ्यांची आता कारणमीमांसा होणार आहे.

उत्तर गोव्यात श्रीपाद नाईकांनी मताधिक्य कसे वाढविलं त्यासाठी कोणते घटक कारणीभूत ठरले, याची कारणे शोधली जाणार आहेत. तर या चिंतन बैठकीतून येणाऱ्या मुद्यांच्या आधारे भाजप संघटनात्मक व मंत्रिमंडळ काही फेरबदल करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com