Hatkanangale Election Result 2024 : आजी-माजी आमदारांमुळेच हातकणंगलेत सत्यजित पाटलांचा झाला 'गेम'; विधानसभेची वाट बिकट

Satyajit Patil Sarudkar : महाविकास आघाडीचे बलस्थान असणाऱ्या इस्लामपूर, हातकणंगले आणि शिराळा मतदारसंघात सत्यजित पाटलांची पीछेहाट झाली.
satyajit patil sarudkar
satyajit patil sarudkarsarkarnama

Kolhapur News, 6 June : हातकणंगले लोकसभा निवडणुकीत धक्कादायक निकाल समोर आला आहे. सुरुवातीला महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील आघाडीवर असताना शेवटच्या फेरीत महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने ( Dhairyasheel Mane ) यांनी मुसंडी मारत विजय पटकावला.

हातकणंगलेमधील इचलकरंजी, शिरोळ विधानसभा मतदारसंघात महायुतीला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले. महाविकास आघाडीचे बलस्थान असणाऱ्या इस्लामपूर, हातकणंगले आणि शिराळा मतदारसंघात सत्यजित पाटलांची पीछेहाट झाली. तर सत्यजित पाटलांचे ( Satyajit Patil ) होमटाऊन असलेल्या पन्हाळा, शाहूवाडी मधून अपेक्षा पेक्षा कमी मताधिक्य मिळाले. आमदार विनय कोरे यांना मताधिक्य रोखण्यात यश आले आहे.

हातकणंगले विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदार महाविकास आघाडीचे होते. या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार राजुबाबा आवळे, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, माजी आमदार राजीव आवळे अशी बलाढ्य पॉवर महाविकास आघाडीकडे असताना महायुतीचे उमेदवार खासदार माने यांना 17 हजार 493 इतके मताधिक्य मिळाले आहे.

हातकलणंगलेच्या निकालामुळे महाविकास आघाडीच्या आजी-माजी आमदारांकडे बोट दाखविण्याची वेळ आली आहे. आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे आणि माजी आमदार अमल महाडिक यांची ताकद निर्णायक ठरली आहे. शिवाय जनसुराज्यकडून इच्छुक असलेले डॉ. अशोकराव माने यांनी केलेली बेरजेचे गणितं देखील तितक्याच यशस्वी ठरली आहेत. या मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची पीछेहाट झाल्याची पाहायला मिळते.

satyajit patil sarudkar
Satej Patil Vs Amal Mahadik : पाटलांच्या होमपिचवर महाडिकांनी 'टेन्शन' वाढवलं; कोल्हापूर दक्षिण भाजपला पोषक

वास्तविक पाहता या मतदारसंघात मराठा, जैन, लिंगायत, मुस्लिम आणि दलित मतदारांची संख्या सम समान आहे. त्यातील मुस्लिम आणि दलित समाजातील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांना पाठिंबा दिला होता. तर जैन लिंगायत आणि मराठा समाज हा महायुतीच्या बाजूने उभा राहिल्याचं चित्र आहे.

एकंदरीतच या निकालामुळे महाविकास आघाडीचे विधानसभेची वाटचाल खडतर बनली आहे. शिवाय आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आजी-माजी आमदारांतील काही गटांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचे चित्र होते. त्यातूनच महायुतीच्या पथ्यावर हातकणंगलेतील मते पडली.


( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com