Kangana Ranaut : सुप्रिया श्रीनेत यांच्या 'कंगना'च्या पोस्टवरून काँग्रेस भाजपमध्ये राडा !

BJP vs Congress : महिला सन्मान या विषयावरून आज काँग्रेस आणि भाजपमध्ये सोशल मीडियावर वाॅर सुरू आहे. देशातील लोकसभा निवडणुकीत कंगना राणावत यांच्यावरील टीका टिप्पणी राजकीय चर्चेचा विषय ठरली आहे.
Supriya Shrinate, Navneet Rana, Kangana Ranaut, Chitra Wagh
Supriya Shrinate, Navneet Rana, Kangana Ranaut, Chitra Wagh Sarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election 2024 : हिमाचल प्रदेशातील मंडी येथून अभिनेत्री कंगना रनाैत यांना भाजपने तिकीट दिले. कंगना यांना दिलेली उमेदवारी आणि मंडी या शब्दांचा चुकीचा शब्द प्रयोग असलेली पोस्ट काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी सोशल मीडियावर टाकली.

त्यावर मोठा राडा काँग्रेस आणि भाजपमध्ये झाला आहे. त्याचबरोबर काँग्रेसच्या किसान आघाडीच्या एका नेत्यानेदेखील कंगना रनाैत यांच्यावर असंसदीय भाषेत टीका केली आहे. त्यावरून देशातील महिला खासदार, नेत्यांनी काँग्रेस नेत्या आणि प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांना घेरण्याची तयारी केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी भाजपवर विविध विषयांवर जोरदार प्रहार केला. विविध टीव्ही चॅनलच्या लाइव्ह शोमध्ये सुप्रिया श्रीनेत या काँग्रेसचे विचार परखडपणे मांडतात, भाजपवर जहरी टीका करतात. काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांच्या एक्स हँडलवरून दुसऱ्या कोणीतरी ती पोस्ट टाकल्याचे सुप्रिया श्रीनेत यांनी स्पष्ट केले आहे.

ती पोस्ट नंतर त्यांनी डिलीट केल्याचे सांगितले. कुणाही महिलेवर त्यांनी आतापर्यंत टीका केली नाही आणि भविष्यात करणार नाही. यावरून भाजपच्या महिला नेत्यांनी सुप्रिया श्रीनेत यांच्यावर आगपाखड सुरू केली आहे. सुप्रिया पॅरोटी नावाचा अकाउंट सुरू आहे. त्यावरून ही पोस्ट टाकली गेली. कुणावरही व्यक्तिगत टीका टिप्पणी मी कधीही करणार नाही.

महिलांच्या विरोधात मी आपत्तीजनक शब्दांचा प्रयोग करू शकत नाही, असे सुप्रिया श्रीनेत यांनी स्पष्ट केले, तर विचारधारेच्या विरोधातील लढाई सुरू राहील, असा ठाम विश्वास सुप्रिया श्रीनेत यांनी व्यक्त केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Supriya Shrinate, Navneet Rana, Kangana Ranaut, Chitra Wagh
Ajit Pawar Vs Vijay Shivtare : शिवतारेंची औकात नाही, मास्टरमाइंड...; अजितदादांच्या आमदारानं सगळंच काढलं

या विषयावरून कंगना रनाैत यांनीदेखील तीव्र आपत्ती व्यक्त केली. त्यांनी मंडी ही काशी असल्याचे सांगत हा समस्त मंडीवासीयांचा अपमान असल्याचे सांगितले. कंगना रनाैत यांनी त्या अभिनेत्री आहेत.

कुठलाही व्यवसाय असो टिचर, अभिनेत्री, पत्रकार, राजनेता असो की, सेक्स वर्कर असो त्या महिलेचा अपमान करणे चुकीचे आहे. मंडी ही छोटी काशी आहे. मंडीवासीयांना या टीकेने मोठा त्रास झाला. या विषयावर तुम्ही महिला आयोगाकडे जाणार का, असे पत्रकारांनी विचारले असता, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना विचारल्यानंतर तक्रार करण्यात येईल, असे कंगना रनाैत यांनी स्पष्ट केले.

निवडणुकीच्या धुळवडीत काँग्रेसवाल्यांचे महिलाद्वेषाने माखलेले हिडीस चेहरे एक-एक करून समोर येत आहे, असे म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी जोरदार टीका केली आहे. राहुल गांधींच्या नारीशक्तीला संपविण्याच्या वक्तव्यांवरून हिंदू धर्म आणि महिलांना आदिशक्ती मानून केले जाणारे त्यांचे पूजन याचा किती तिटकारा आहे हे समोर आल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या.

या चिखलफेकीत आता त्यांच्या पक्षाच्या महिला पदाधिकारीही उतरल्यात. काँग्रेसच्या महिला पदाधिकारी सुप्रिया श्रीनेत यांनी भाजपच्या मंडी लोकसभेच्या उमेदवार व अभिनेत्री कंगना रनाैत यांच्या उमेदवारीवरून आक्षेपार्ह टिप्पणी केली. यावरून हा पक्ष स्त्रीचा किती सन्मान करतो, याची लक्तरे वेशीवर मांडणारी सुप्रिया श्रीनेत यांची पोस्ट होती, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे.

अभिनयासारख्या कलेला, महिलेला बाजारू आणि विक्रीयोग्य ठरवण्याचं समर्थन करणाऱ्या काँग्रेसनेच देशातल्या महिलांच्या आत्मसन्मानावर आजपर्यंत सपासप वार केलेत. महिलाद्वेषाचं विष काँग्रेसचं नेतृत्व करणाऱ्या अशा लहान-मोठ्या नेत्यांमध्ये पुरेपूर भरलेलं आहे. ते विष या देशातल्या महिलाच आता उतरवतील, असा दावा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे.

या विषयावरून अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी काँग्रेसवर जोरदार आगपाखड केली. इंदिरा गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी या महिला काँग्रेसचे नेतृत्व करतात. महिलांचा सन्मान काँग्रेस विसरले का, असा प्रश्न राणा यांनी केला आहे.

महिलांचा सन्मान कसा करता हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शिका, मोदी यांनी देशातील महिलांना 33 टक्के आरक्षण दिले आहे, तर सुप्रिया श्रीनेत यांना त्वरित काँग्रेस पक्षाने काढण्याची गरज आहे. काँग्रेसला देशातील महिला त्यांची जागा दाखवतील, असे नवनीत राणा यांनी स्पष्ट केले आहे.

R

Supriya Shrinate, Navneet Rana, Kangana Ranaut, Chitra Wagh
Abhijit Gangopadhyay News : गांधी आणि गोडसे यांच्यापैकी..! वादग्रस्त विधानामुळे गंगोपाध्याय यांची उमेदवारी जाणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com