Ajit Pawar Vs Vijay Shivtare : शिवतारेंची औकात नाही, मास्टरमाइंड...; अजितदादांच्या आमदारानं सगळंच काढलं

Ajit Pawar Meeting In Pune : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि आमदारांची बैठक पुण्यात 'बोट क्लब' येथे पार पडत आहे.
Vijay Shivtare | Ajit Pawar
Vijay Shivtare | Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

शिवसेना नेते, माजी मंत्री विजय शिवतारे ( Vijay Shivtare ) बारामती लोकसभा मतदारसंघातून ( Baramati Lok Sabha Constituency ) अपक्ष लढवण्यावर ठाम आहेत. त्यामुळे बारामतीत सुप्रिया सुळे-सुनेत्रा पवार-विजय शिवतारे यांच्यात तिरंगी लढत होणार, हे अटळ आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांना खुले आव्हान देताना दिसत आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी ( Amol Mitkari ) यांनी शिवतारेंच्या मागचा बोलवता धनी वेगळाच असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे शिवतारेंचा बोलवता धनी कोण? याबाबत चर्चा रंगल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि आमदारांची बैठक पुण्यात 'बोट क्लब' येथे पार पडत आहे. या वेळी मिटकरींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हा मिटकरींनी ( Amol Mitkari ) शिवतारेंचा समाचार घेताना औकात काढली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"सात जागांवर आमचा दावा कायम"

"लोकसभेच्या किती जागा मिळतील, कुणाकुणाला जबाबदारी दिली जाईल, हे बैठकीनंतर स्पष्ट होईल. सातही लोकसभा मतदारसंघांवर आमचा दावा कायम आहे. शिर्डी आणि साताऱ्याची जागा अदलाबदल करण्याबाबत माहिती नाही. वरिष्ठ पातळीवर याची चर्चा सुरू असण्याची शक्यता आहे," असं मिटकरींनी सांगितलं.

Vijay Shivtare | Ajit Pawar
Vijay Shivtare Vs Ajit Pawar : अजितदादांची तुलना विंचवाशी; शिवतारेंच्या विधानामुळे राष्ट्रवादी महायुतीतून बाहेर पडणार?

"बारामतीत सुनेत्रा पवारच उमेदवार"

"महादेव जानकर हे बारामतीतून लढणार, या चर्चेला काही अर्थ नाही. परभणीतून ते निवडणूक लढतील. त्यामुळे जानकर बारामतीमधून लढणार या सगळ्या तथाकथित चर्चा आहेत. आमच्यातील 'तुतारी' गट अशा प्रकारच्या अफवा पसरवत असतो. त्यामुळे तेथील वातावरण बिघडावे, अशी त्यांची इच्छा आहे. बारामतीत सुनेत्रा पवार उमेदवार असतील," असं मिटकरींनी म्हटलं.

"शिवतारेंच्या मागचा मास्टरमाइंड बारामतीत समोर येईल"

"विजय शिवतारेंच्या प्रकृतीची आम्हाला फार काळजी आहे. कुटुंबात एखादा वैफल्यग्रस्त असतो, तेव्हा अशा प्रकारचे विधान होत असतात. यंदा शिवतारेंचं डिपॉझिटही वाचणार नाही. अजितदादांवर बोलून त्यांना आसुरी आनंद घ्यायचा, तर तो त्यांनी घ्यावा. मात्र, शिवतारेंची एवढी औकातच नाही. शिवतारेंच्या मागचा मास्टरमाइंड दुसराच आहे. बारामतीत आम्ही प्रचाराला गेल्यावर तो मास्टरमाइंड समोर येईल," असा सूचक इशारा मिटकरींनी दिला आहे.

( Edited By : Akshay Sabale )

R

Vijay Shivtare | Ajit Pawar
Vijay Shivtare Vs Ajit Pawar : 'अनेकांना डसला अन् महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसला'; शिवतारेंची अजितदादांवर जहरी टीका!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com