Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी 16 एप्रिलचा मुहूर्त? देशभर चर्चांना उधाण!

Election Commission of India : जाणून घ्या , केंद्रीय निवडणूक आयोगाने या संदर्भात काय म्हटलं?
Election Commission
Election CommissionSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : लोकसभा निवडणुकीचे सर्वांनाच वेध लागले आहे. राजकीय पक्षासह सर्वसामान्य माणूसही निवडणुकीची तारीख कधी जाहीर होईल, याची वाट पाहत आहे. दरम्यान आज आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती सोशल मीडियावर आणि काही माध्यमांवर आल्याने, सर्वत्र चर्चांना उधाण आले होते. कारण, 16 एप्रिल रोजी लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली गेली होती. मात्र दिल्लीतील मुख्य निवडणूक कार्यालयातून हे वृत्त फेटाळले गेले.

दिल्ली निवडणूक आयोगाच्यावतीने जाहीर झालेल्या परिपत्रकासंदर्भात मीडियामधून प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले, की लोकसभा निवडणुकीसाठीची संभाव्य तारीख 16 एप्रिल आहे का? यानंतर एका ट्वीटद्वारे स्पष्ट करण्यात आले की, या तारखेचा उल्लेख केवळ अधिकाऱ्यांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निवडणुकीच्या आराखड्यानुसार कामकाजाचे नियोजन करण्याच्यादृष्टीने करण्यात आला होता. त्यामुळे निवडणुकीची तारीख 16 एप्रिल असण्याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Election Commission
Rahul Gandhi : पोलिसांना मारण्यासाठी राहुल गांधींनी भडकावलं! मुख्यमंत्र्यांनी पुरावाच दिला...

व्हायरल होत असलेल्या अधिसूचनेत नेमके काय?

व्हायरल होत असलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की भारताच्या निवडणूक आयोगाने तात्पुरत्या उद्देशाने मतदानाचा दिवस 16 एप्रिल 2024 हा संदर्भासाठी आणि निवडणुकीच्या नियोजनात प्रारंभ आणि शेवटच्या तारखांची गणना करण्यासाठी दिला होता.

CEO Delhi
CEO DelhiSarkarnama

दिल्लीच्या सर्व 11 जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना ही अधिसूचना जारी करण्यात आली होती आणि त्याचा विषय 'भारतीय निवडणूक आयोगाच्या निवडणूक आराखड्यात दिलेल्या वेळेचे पालन असा हा आहे.

यानंतर थोड्याच वेळात, दिल्लीच्या सीईओच्या कार्यालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केले आणि ती तारीख 'फक्त संदर्भासाठी' होती यावर भर दिला.

Election Commission
Jagan Mohan Reddy : जगनमोहन यांना मोठा धक्का; निवडणुकीआधी खासदारांचे राजीनामे सुरूच...

दरम्यान, निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेतल्यास नवीन 'इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन' (ईव्हीएम) खरेदी करण्यासाठी दर 15 वर्षांनी सुमारे 10,000 कोटी रुपये लागतील.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com