Rahul Gandhi : पोलिसांना मारण्यासाठी राहुल गांधींनी भडकावलं! मुख्यमंत्र्यांनी पुरावाच दिला...

Himanta Biswa Sarma : आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी शेअर केला व्हिडीओ...
Himanta Biswa Sarma, Rahul Gandhi
Himanta Biswa Sarma, Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Assam News : आसाममध्ये काँग्रेस भारत जोडो न्याय यात्रेत आज मोठा राडा झाला. गुवाहाटीच्या सीमेवर आल्यानंतर कायकर्त्यांना थांबवून ठेवण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बॅरिकेड्स लावले होते. त्यावरून पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. यामध्ये पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा दावा काँग्रेसकडून केला जात आहे. तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पोलिसांना मारण्यासाठी कार्यकर्त्यांना भडकावल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) न्याय यात्रेदरम्यान झालेल्या गोंधळानंतर राज्याच्या पोलिस महासंचालकांना राहुल गांधीवर (Rahul Gandhi) गुन्हा दाखल करण्यात आदेश दिले आहेत. त्यानंतर त्यांनी तासाभरातच सोशल मीडियात एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. राहुल गांधी हे गर्दीला भडकावत असल्याचा हा पुरावा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. (Congress Bharat Jodo Nyay Yatra)

Himanta Biswa Sarma, Rahul Gandhi
Congress Nyay Yatra : न्याय यात्रेवर लाठीचार्ज; राहुल गांधी आसाममध्ये अडकणार? मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांना आदेश

सरमा यांनी व्हिडीओ पोस्ट करीत म्हटले आहे की, राहुल गांधी आणि जितेंद्र सिंह हे कशाप्रकारे पोलिसांना मारण्यासाठी गर्दीला भडकावत आहेत, याचे पुरावे समोर येत आहेत. आमचे जवान जनतेचे सेवक आहेत, कोणत्या शाही परिवाराचे नव्हे. निश्चिंत राहा, कायद्याचे हात लांब आहेत, तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील, असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

न्याय यात्रेला गुवाहाटी (Guwahati) शहरात येण्यापासून रोखल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर कार्यकर्त्यांनी आक्रमक होत बॅरिकेड्स तोडले. यादरम्यान पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. यामध्ये काही कार्यकर्ते व पोलिसही जखमी झाले आहेत.

गुवाहाटीतील प्रमुख रस्त्यांवर जाण्यास यात्रेला परवानगी नाकारली आहे. या रस्त्यांवरून यात्रेला परवानगी दिल्यास मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होऊ शकते, असा दावा सरकारने केला आहे. त्यामुळे आसाम सरकारने यात्रेला राष्ट्रीय महामार्गाने जाण्यास परवानगी दिली होती. दरम्यान, या गोंधळानंतर राहुल गांधींसह काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठाण मांडून निषेध केला.

R...

Himanta Biswa Sarma, Rahul Gandhi
Congress Nyay Yatra : न्याय यात्रेवर लाठीचार्ज; राहुल गांधी आसाममध्ये अडकणार? मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांना आदेश

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com