Loksabha Election 2019 : गेल्या लोकसभा निवडणुकीत नोटामध्ये मतदान करणाऱ्यांची संख्या ही 2014 च्या तुलनेत टक्केवारीत कमी होती. पण, ती काही लाखांत होती. मोठ्या प्रमाणात मतदार असलेल्या उमेदवारांपैकी कोणी लायक नाही म्हणून मते टाकायला लागली आहे. हा सर्व प्रकार केंद्रीय निवडणूक आयोगाने 2013 पासून सुरू केला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत 2013 मध्ये ECI ने स्थापित केलेल्या NOTA बटणाने मतदारांना त्यांच्या मतदारसंघातील सर्व उमेदवारांना नाकारण्याचा पर्याय दिला होता. लोकसभेत 2019 मध्ये झालेल्या 61,31,33,300 मतांपैकी 65,14,558 (1.06%) NOTA साठी मतदान झाले. लोकसभा, 2014 मध्ये झालेल्या 55,38,02,946 मतांपैकी 60,02,942 (1.08%) NOTA साठी मतदान झाले. लोकसभा निवडणुकीत इतक्या मतांचा वापर हा फक्त नोटासाठी होणे हे अनेक उमेदवारांचे विजयाचे गणित बिघडविणारे असेच आहे. त्यामुळे काही उमेदवारांना घरी बसावे लागते तर काहींना अचानक लाॅटरी लागण्यासारखा फायदा या नोटा मतदानामुळे होतो.
लोकसभा निवडणुकीत गेल्या वेळी 2019 मध्ये सर्वसाधारणपणे उमेदवाराला एकूण मतदानाच्या सरासरी 52.7 टक्के मते मिळाल्यावर तो विजयी झाल्याचे चित्र होते. 341 खासदार हे त्यांच्या मतदारसंघातील एकूण मतांपैकी 50 टक्के आणि त्याहून अधिक मतांनी विजयी झाले. तर 201 खासदार हे त्यांच्या मतदारसंघातील एकूण मतदानाच्या 50 टक्के पेक्षा कमी मतांनी विजयी झाले होते. यात भाजप 79 खासदार निवडले गेले, तर काँग्रेसचे 34 खासदार हे मतदारसंघातील एकूण मतदानाच्या 50 टक्केपेक्षा कमी मतांनी विजयी झाल्याचे चित्र होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भारतीय लोकशाहीत मतदार हा राजा असतो. याचा प्रत्यय अनेक उमेदवारांना येतो. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये जिंकणारा आणि पराभूत उमेदवारामध्ये केवळ दोन हजार किंवा त्यापेक्षा कमी मतांचे अंतर होते. असे एकूण सात खासदार देशभरात विजयी झाले. ज्याचे मताधिक्य अर्थात लीड हा केवळ दोन हजार मतांपेक्षा कमी होता. त्यामुळे निवडणूक अनेकांना तारते तर अनेकांचे राजकीय करिअर संपविते. यात भोलानाथ हे पहिल्या क्रमांकावर होते. त्यांच्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्षद्वीपचे उमेदवार मोहम्मद फैजल होते ते केवळ 823 मतांनी जिंकले होते. त्यानंतर पश्चिम बंगालमधील आरामबाग मतदारसंघातून अपरूपा पोद्दार (आफ्रिन अली) 1142 मतांनी जिंकले, तर अंदमान निकोबारचे काँग्रेस उमेदवार कुलदीप राॅय शर्मा 1407 मतांनी जिंकले, तर झारखंड येथून खुंटी मतदारसंघातून भाजपचे अर्जुन मुंडा हे 1445 मतांनी जिंकले. चंद्रशेखर प्रसाद हे जनता दला युनायटेडचे बिहारमधील जहानाबाद येथून केवळ 1751 मतांनी जिंकले. भाजपचे व्ही. श्रीनिवास प्रसाद हे कर्नाटकचे उमेदवार चामराजनगर येथून केवळ 1817 मतांनी जिंकले.
2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भोलानाथ हे भाजपचे उमेदवार देशात सर्वात कमी मतांनी विजयी झाले होते. ते विजयी होतात की नाही हा मोठा चर्चेचा विषय निवडणूक मतमोजणी काळात होता. यंदा भोलानाथ यांना तिकीट मिळते की, नाही हेदेखील पाहण्यासारखे असेल. उत्तर प्रदेशातील भोलानाथ यांचा निसटता विजय त्यांच्या जीवनात बदल करणारा होता. पण, त्यांच्या विजयाने इतक्या कमी मतांनीदेखील विजय मिळतो हे आश्चर्य अजूनही चर्चेत आहे. भोलानाथ अर्थात बी. पी. सरोज यांना जिंकण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागली. इतकेच नाही तर मोजणीच्या वेळी प्रत्येक क्षण हा अत्यंत उत्कंठेचा होता. भोलानाथ यांना थोडे नाही तर तब्बल 4,88,397 मते मिळाली होती, तर त्यांचा प्रतिस्पर्धी उमेदवारदेखील तगडा होता. त्रीभुवन राम अर्थात टी. राम यांना 4,88,216 मते मिळाली. टी. राम यांच्यापेक्षा भोलानाथ यांना केवळ 181 मते अधिक मिळाली आणि भोलानाथ देशात सर्वात कमी मतांनी जिंकणारे भाजपचे उमेदवार ठरले. त्यांचा मतदारसंघ होता उत्तर प्रदेशातील मछलीशहर.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.