Electoral Bond Scam : 'चंदा दो, धंदा लो; इलेक्टोरल बाँड भारतातील सर्वात मोठा स्कॅम!'

Congress Vs BJP : इलेक्टोरल बाँड स्वतंत्र भारतातील सर्वात मोठा घोटाळा. ईडी, आयकर विभागाची कारवाई व कंत्राटे मिळालेल्या कंपन्यांकडून इलेक्टोरल बाँडची खरेदी.
Electoral Bond
Electoral BondSarkarnama
Published on
Updated on

Bharat Nyay Yatra In Maharashtra : इलेक्टोरल बाँडसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल महत्त्वपूर्ण आहे. भारतीय जनता पक्षाला इलेक्टोरल बाँडमधून सहा हजार कोटी रुपये मिळाले आहेत. ईडी, आयकर, सीबीआयची कारवाई झाली त्या कंपन्यांनी इलेक्टोरल बाँड घेतले आहेत, त्याचा फायदा कोणत्या पक्षाला झाला हे स्पष्ट आहे. तसेच ज्या कंपन्यांना मोठ्या कामाची कंत्राटे मिळाली त्या कंपन्यांनीही हे बाँड खरेदी केले आहेत. इलेक्टोरल बाँड हा सरळ सरळ हप्तावसुलीचा प्रकार आहे. भाजपचे धोरण स्पष्ट आहे, ‘चंदा दो, धंदा लो’, असा हल्लाबोल अखिल भारतीय काँग्रेसच्या मीडिया विभागाचे प्रभारी जयराम रमेश यांनी केला. (Electoral Bond Scam)

पालघर जिल्ह्यातील वाडा येथील पत्रकार परिषदेला जयराम रमेश (Jairam Ramesh) संबोधित करत होते. ते म्हणाले की, इलेक्टोरल बाँड हा स्वतंत्र भारतातील सर्वात मोठा घोटाळा आहे. ईडी, सीबीआय, आयकर विभागाच्या माध्यमातून धमकी देऊन हप्ता वसुली केल्याचा हा प्रकार आहे. इलेक्टोरल बाँड (Electoral Bond) खरेदीमध्ये शेल कंपन्यांचा वापरही मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. ज्या कंपन्यांना रस्ते, भुयार यांसारखी मोठ्या किमतीची कंत्राटे मिळाली, त्या कंपन्यांनी हे बाँड घेतले आहेत. कामाच्या बदल्यात इलेक्टोरल बाँड हे स्पष्ट झाले आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ही यादी जाहीर केली असली तरी त्यात आणखी माहिती प्रकाशित होण्याची गरज आहे. सुप्रीम कोर्टाने आज दिलेल्या निर्देशानंतर जी माहिती बाहेर येईल त्यातून कोणत्या कंपनीकडून कोणत्या पक्षाला किती पैशाचा लाभ झाला हेही स्पष्ट होईल.

Electoral Bond
Vijay Shivtare News : मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही विजयबापूंची माघार नाहीच! सासवडमध्ये अजितदादांच्या सभास्थळी बॅनरबाजी

ईव्हीएमसंदर्भात इंडिया आघाडी (INDIA Alliance) मागील दहा महिन्यांपासून निवडणूक आयोगाकडे भेटण्यास वेळ मागत आहे, पण आयोग वेळ देत नाही. ईव्हीएमबरोबर व्हीव्हीपॅटचा उपयोग करावा ही इंडिया आघाडीची मागणी आहे. आयोगाला भेटून एक निवेदन देण्याचा प्रयत्न आहे, परंतु निवडणूक आयोग भेटतच नाही. निवडणूक आयोगावर कोणाचा दबाव आहे का? असा सवाल करत हे लोकशाहीला धोकादायक आहे, असेही जयराम रमेश म्हणाले.

भारत जोडो न्याय यात्रा मणिपूरच्या इम्फाळपासून मुंबईपर्यंतची सहा हजार 700 किलोमीटरची यात्रा देशाच्या भवितव्यासाठी परिवर्तनकारी ठरेल. ही वैचारिक यात्रा आहे आणि अशाच पद्धतीच्या यात्रा राज्याराज्यांत तसेच जिल्हा स्तरावर होत राहतील. विचारधारेत स्पष्टता येण्यासाठी तसेच जनतेशी संवाद साधण्यासाठी यात्रा महत्त्वाची आहे. यात्रा पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह व ऊर्जा निर्माण करण्यासाठी मोलाची ठरली आहे. द्वेष पसरवणाऱ्या विचारधारेला पाच साल, पाच न्याय आणि 25 गॅरंटीधून उत्तर दिले आहे. महाराष्ट्रात नंदूरबारपासून सुरू झालेली यात्रा उद्या मुंबईत चैत्यभूमीवर समाप्त होईल, असे जयराम रमेश म्हणाले.

(Edited by Sunil Dhumal)

R

Electoral Bond
Mahadev Jankar News : माढा की परभणी अन् महायुती की आघाडी? महादेव जानकरांचे इरादे स्पष्ट!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com