Rahul Gandhi Flying Kiss : 'फ्लाईंग किस' करताना काय म्हणाले राहुल गांधी ?

Rahul Gandhi Vs Smriti Irani : राहुल गांधींविरोधात सत्ताधारी महिला खासदार आक्रमक
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Delhi News : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या मागे लागलेले शुक्लकाष्ट काही केल्या संपण्याचे नाव घेताना दिसत नाही. मोदी अडनावावरून तब्बल १३७ दिवस रद्द झालेली खासदारकी त्यांना मिळताच राहुल यांना नव्या वादाने घेरले आहे. गांधी यांच्यावर संसदेत महिला सदस्यांकडे पाहत 'फ्लाईंग किस' केल्याचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी केला आहे. या गंभीर आरोपानंनतर भाजप-काँग्रेसमध्ये पुन्हा नव्या संघर्षाला सुरूवात झालेली आहे. या प्रकरणी भाजपने रान उठवण्यास सुरू केल्यानंतर काँग्रसनेही आपली बाजू ठासून मांडली आहे. (Latest Political News)

राहुल गांधी यांच्या 'फ्लाइंग किस'वरून लोकसभेत प्रचंड गदारोळ सुरू झालेला आहे. यावर काँग्रसच्या वतीने सांगण्यात आले की, पक्षाचे खासदार सर्वसाधारणपणे कोषागार बाकांकडे हातवारे करत होते. ते कोणत्याही मंत्र्याकडे किंवा सदस्यांकडे निर्देशित नव्हते, विशेषतः महिला खासदार. राहुल गांधींनी 'फ्लाइंग किस' केल्यानंतर निघाले त्यावेळी ते 'बंधू आणि भगिनी' असे म्हटले होते. त्यांनी ते कोणत्याही विशिष्ट मंत्री किंवा खासदाराकडे निर्देशित केले नाही. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे तर अजिबात नाही."

Rahul Gandhi
Manipur MP In Parliament: भाजपनं मणिपूरच्याच खासदारांचं तोंड बंद केलं; कोण आहे ते ? गौरव गोगोईंच्या आरोपाने चर्चा

काय म्हणाल्या स्मृती इराणी?

स्मृती इराणी संसदेत बोलताना म्हणाल्या, "मी एक गोष्ट सभागृहातच्या समोर आणत आहे. ज्यांनी माझ्या आधी लोकसभेत भाषण केलं (राहुल गांधी) त्यांनी जाता जाता एका विचित्र लक्षणाची प्रचिती दिली. हे एका पुरूषीवर्चस्ववादी विचार असणाऱ्या व्यक्तिकडून असे वर्तन घडू शकते. त्यांनी संसदेच्या सहा महिलांना 'फ्लाईंग किस' दिल्याचा इशारा केला. अशा प्रकारच्या सभ्यता नसलेल्या वर्तनाला या देशाच्या सभागृहात कधीच पाहिलं गेलं नाही. हे कोणत्या कुटुंबाचे लक्षण आहे, हे आज देशाच्या लक्षात आले."

Rahul Gandhi
Vidarbha Activists Morcha: फडणवीसांच्या निवासस्थानाबाहेर विदर्भवाद्यांचा मोर्चा; काही आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

२२ महिला खासदारांनी तक्रारीचे पत्र

राहुल गांधींच्या फ्लाईंग किसनंतर सत्ताधारी पक्षांतील २२ महिला खासदारांनी लोकसभा सचिवालयात पत्र पाठवले आहे. यामुळे राहुल गांधीना हे प्रकरण राहुल गांधींना भोवण्याची शक्यता आहे. राहुल गांधींवर कारवाईची मागणी होत आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासून कारवाई करा, अशी भाजप खासदारांची मागणी आहे. 'या बाबतीत तपास करून कारवाई करू, असे सचिवालयातून सांगण्यात आले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com