Farooq Abdullah : 'प्रभू श्रीराम केवळ हिंदुंचे नाहीत, ते...' ; प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त फारुख अब्दुल्लांचं मोठं विधान!

Ayodhya Ram Temple Ceremony : भारतात बंधुभाव कमी होत आहे आणि त्याला पुनरुज्जीवित करण्याची गरज आहे. असंही बोलून दाखवलं.
Farooq Abdullah
Farooq AbdullahSarkarnama
Published on
Updated on

Poonch : नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी शनिवारी अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी प्रयत्न करणाऱ्यांचे अभिनंदन केले आणि म्हटले की, भारतात बंधुभाव कमी होत आहे आणि त्याला पुनरुज्जीवित करण्याची गरज आहे.

याशिवाय अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनी म्हटले की, अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे. मी मंदिरासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छितो, ते आता तयार आहे. तसेच त्यांनी यावरही जोर दिला की, भगवान राम केवळ हिंदुंचे नाहीत, ते जगभरातील सर्वांचे आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Farooq Abdullah
Narendra Modi in Ayodhya : पंतप्रधान मोदी आज अयोध्या दौऱ्यावर; 1500 कोटींच्या प्रकल्पांची घोषणा...

मी संपूर्ण जगाला हेही सांगू इच्छितो की, भगवान राम केवळ हिंदुंचे नाहीत, ते जगभरातील सर्वांचे आहेत, हे पुस्तकांमध्ये लिहिलं आहे. तसेच त्यांनी सांगितले की त्यांनी बंधूभाव, प्रेम, एकता आणि एकमेकांना सहाय्य करण्याचा संदेश दिला आहे.

अब्दुल्लांनी म्हटले की, आपल्या देशात बंधूभाव कमी होत आहे, तो टिकवावा. मी प्रत्येकाला सांगू इच्छितो की, बंधूभाव कायम राखावा.

अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापणेची लगबग सुरू आहे. या सोहळ्यासाठी निमंत्रितांच्या यादीवरून राजकारण सुरू आहे, अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) अयोध्येला पोहचले आहेत. रामजन्मभूमीवर उभारण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिरात 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठापना करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी त्यांच्या आजच्या दौऱ्यात त्यांनी आंतरराष्ट्रीय विमानतळ, महामार्ग, रेल्वे स्टेशन आणि रेल्वे मार्ग दुहेरीकरण यासह अनेक मोठे प्रकल्पांचे उद्घाटन केले.

Farooq Abdullah
PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या अयोध्या दौऱ्यातील भाषणामधील महत्त्वाचे मुद्दे

रामजन्मभूमी मंदिराशी संबंधित महत्त्वाच्या प्रकल्पांवर मोदी सरकारने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. यासोबतच चार प्रमुख रस्त्यांचेही उद्घाटन होणार आहे. अयोध्येशिवाय उत्तर प्रदेशातील इतरही जिल्ह्यांतील काही प्रकल्पांचाही यात समावेश करण्यात आला आहे. 

(edited by - mayur ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com