Narendra Modi in Ayodhya : पंतप्रधान मोदी आज अयोध्या दौऱ्यावर; 1500 कोटींच्या प्रकल्पांची घोषणा...

Ram Mandi Ayodhya News : 'अयोध्या-सुलतानपूर राष्ट्रीय महामार्ग-330 ते विमानतळापर्यंत 4 लेन रस्ता...'
Narendra Modi in Ayodhya
Narendra Modi in Ayodhya Sarkarnama
Published on
Updated on

Ayodhya News : अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापणेची लगबग सुरू आहे. या सोहळ्यासाठी निमंत्रितांच्या यादीवरून राजकारण सुरू आहे, अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्या दौऱ्यावर येत आहेत. रामजन्मभूमीवर उभारण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिरात 22 जानेवारी रोजी रामलल्लांचा अभिषेक करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी त्यांच्या आजच्या दौऱ्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ, महामार्ग, रेल्वे स्टेशन आणि रेल्वे मार्ग दुहेरीकरण यासह अनेक मोठे प्रकल्पांचे उद्घाटन करतील. (Latest Marathi News)

Narendra Modi in Ayodhya
Amol Kolhe: 'आपल्यालाच का टार्गेट केलं जातंय ?' कोल्हेंचा सवाल; मोदी, अजित पवार गटावरही केले गंभीर आरोप

रामजन्मभूमी मंदिराशी संबंधित महत्त्वाच्या प्रकल्पांवर मोदी सरकारने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. यासोबतच चार प्रमुख रस्त्यांचेही उद्घाटन होणार आहे. अयोध्येशिवाय उत्तर प्रदेशातील इतरही जिल्ह्यांतील काही प्रकल्पांचाही यात समावेश करण्यात आला आहे. महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनासोबतच पंतप्रधान 15 हजार 700 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन करतील. पुनर्विकसित अयोध्या धाम रेल्वे स्थानकाच्या लोकार्पणासोबतच, देशातील विविध मार्गांवरून धावणाऱ्या सहा 'वंदे भारत' आणि दोन 'अमृत भारत' रेल्वेंनाही ते हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज शनिवारी अयोध्या धाम रेल्वे जंक्शनचं लोकार्पण होणार आहे. यासोबतच श्री माता वैष्णोदेवी कटरा-नवी दिल्ली, अमृतसर-नवी दिल्ली, कोईम्बतूर-बेंगळुरू, मंगळुरू-मडगाव, जालना-मुंबई आणि अयोध्या-आनंद विहार टर्मिनल तसेच अयोध्या-दरभंगा आणि मालदा दरम्यान 6 'वंदे भारत' तसेच 2 'अमृत भारत' गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे.

Narendra Modi in Ayodhya
Karnatak BJP Politics : कर्नाटकात 'ऑपरेशन लोटस' राहिले दूरच,भाजपच्याच मागे लागला भ्रष्टाचाराचा भुंगा!

पंतप्रधान ज्या प्रमुख प्रकल्पांची पायाभरणी करतील त्यामध्ये राष्ट्रीय महामार्गच्या (NH-27) लखनौ-अयोध्या विभागात EPC मोडमध्ये किमी 8.000 ते किमी 121.600 रुंदीकरण, NH-27 वरील अयोध्या बायपासचे किमी 121.600 ते किमी 021.600 पर्यंत रुंदीकरण यांचा समावेश आहे. एअर इंडिया एक्स्प्रेसने 17 जानेवारीपासून अयोध्या ते बेंगळुरू आणि कोलकाता यांना जोडणारी थेट विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला अयोध्या ते दिल्ली दरम्यान थेट विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली होती.

कोणत्या प्रकल्पांचे उद्घाटन ?

- 46 प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी

- अयोध्या धाम जंक्शनवरून 6 वंदे भारत आणि 2 अमृत भारत रेल्वेला हिरवा झेंडा

- आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करणार, जाहीर सभेला संबोधित करणार

- राम पथ (सहदतगंज ते नवीन घाट)

- भक्ती पथ (अयोध्या मुख्य रस्त्यापासून हनुमान गढी मार्गे श्री रामजन्मभूमीपर्यंत)

- धर्म पथ (NH-27 ते नया घाट जुन्या पुलापर्यंत)

- राजर्षी दशरथ स्वायत्त राज्य वैद्यकीय महाविद्यालय

- NH-27 बायपास, महोब्रा बाजार मार्गे तेढी बाजार श्री रामजन्मभूमीपर्यंत 4 लेन रस्ता

- महर्षी अरुंधती पार्किंग आणि कमर्शियल कॉम्प्लेक्स

- अयोध्या-सुलतानपूर राष्ट्रीय महामार्ग-330 ते विमानतळापर्यंत 4 लेन रस्ता

- जौनपूर-अयोध्या-बाराबंकी रेल्वे मार्ग प्रकल्पांतर्गत चार विभागांचे दुहेरीकरण

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com