PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या अयोध्या दौऱ्यातील भाषणामधील महत्त्वाचे मुद्दे

PM Modi Ayodhya Visit Live Updates News in Marathi : 14 ते 22 जानेवारीपर्यंत प्रत्येक मंदिरात स्वच्छता मोहीम
Narendra Modi in Ayodhya
Narendra Modi in Ayodhya Sarkarnama
Published on
Updated on

Ayodhya News : अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापणेची लगबग सुरू आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्या दौरा केला. रामजन्मभूमीवर उभारण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिरात 22 जानेवारी रोजी रामलल्लांचा अभिषेक करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी त्यांच्या आजच्या दौऱ्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ, महामार्ग, रेल्वे स्टेशन आणि रेल्वे मार्ग दुहेरीकरण यासह अनेक मोठे प्रकल्पांचे उद्घाटन केले. या दरम्यान पंतप्रधानांनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा पुढीलप्रमाणे. (Latest Marathi News)

22 जानेवारीला निमंत्रणाशिवाय अयोध्येत येऊ नका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारीला देशातील जनतेला अयोध्येत न येण्याचे आवाहन केले आहे. ज्यांना आमंत्रण पाठवले आहे त्यांनीच यावे, असेही स्पष्ट केले.

'14 ते 22 जानेवारीपर्यंत प्रत्येक मंदिरात स्वच्छता मोहीम

पंतप्रधान मोदी म्हणाले, देशातील सर्व तीर्थक्षेत्रे आणि मंदिरांना माझी विनंती आहे की, भव्य रामाच्या उभारणीसाठी 14 जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या दिवसापासून देशभरातील सर्व तीर्थक्षेत्रावर स्वच्छता मोहीम राबवावी.

अयोध्येला देशातील सर्वात स्वच्छ शहर बनवा

अयोध्येला भारतातील सर्वात स्वच्छ शहर बनवायचे आहे. 14 जानेवारी ते 22 जानेवारीपर्यंत प्रत्येक मंदिरात स्वच्छता मोहीम राबवायची आहे.

घरी रामज्योती प्रज्वलित करून दिवाळी साजरी करावी

पंतप्रधान मोदी म्हणाले, हा ऐतिहासिक क्षण सुदैवाने आपल्या सर्वांच्या आयुष्यात आला आहे. देशासाठी नवा संकल्प घ्यायचा आहे, नव्या ऊर्जेने स्वत:ला भरायचे आहे. यासाठी 140 कोटी देशबांधवांनो 22 जानेवारीला घरोघरी श्री राम ज्योती प्रज्वलित करा आणि दिवाळी साजरी करा.

आधुनिक रेल्वे बांधणीच्या दिशेने मोठे पाऊल

पंतप्रधान मोदी म्हणाले, आज देशाने आधुनिक रेल्वे बांधणीच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल टाकले आहे. 'वंदे भारत' आणि 'नमो भारत'नंतर आज देशाला आणखी एक आधुनिक ट्रेन मिळाली आहे. या नव्या ट्रेनला 'अमृत भारत' ट्रेन असे नाव देण्यात आले आहे. वंदे भारत, नमो भारत आणि अमृत भारत ट्रेनची ही त्रिमूर्ती भारतीय रेल्वेला नवसंजीवनी देणार आहे.

अयोध्याधाम रेल्वे स्थानकाची 60 हजार प्रवाशांची क्षमता

अयोध्या धाम विमानतळाचे नामकरण त्रिकालदर्शी महर्षी वाल्मिकी यांच्या नावाने केल्यास या विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला आशीर्वाद मिळेल. महर्षी वाल्मिकी यांनी लिहिलेले रामायण हे ज्ञानाचा मार्ग आहे जो आपल्याला भगवान श्री रामाशी जोडतो. आधुनिक भारतात, महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ, अयोध्या धाम, आपल्याला दिव्य-भव्य-नवीन राम मंदिराशी जोडेल.

सध्या अयोध्या धाम रेल्वे स्थानकाची 10-15 हजार प्रवाशांना सेवा देण्याची क्षमता आहे. स्टेशनचा पूर्ण विकास झाल्यानंतर अयोध्याधाम रेल्वे स्थानकाची क्षमता 60 हजार प्रवासांची होईल.

'315 हून अधिक नवीन वैद्यकीय महाविद्यालये'

पंतप्रधान मोदी म्हणाले, आज देशात केवळ केदारधामचे पुनरुज्जीवन झाले नाही तर 315 हून अधिक नवीन वैद्यकीय महाविद्यालयेही बांधली गेली आहेत. आज देशात केवळ महाकाल महालोकाचीच निर्मिती झाली नाही, तर प्रत्येक घरात पाणीपुरवठा करण्यासाठी 2 लाखांहून अधिक पाण्याच्या टाक्याही बांधल्या गेल्या आहेत.

(Edited by Sudesh Mitkar)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com