Karnataka CM : मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याच्या पूर्वसंध्येला दोन नेते नाराज ; पक्षश्रेष्ठींसाठी डोकेदुखी..

M.B. patil G Parameshwara upset : दोन नेत्यांची नाराजी पक्षश्रेष्ठींसाठी डोकेदुखी ठरणार का, हे लवकरच समजेल.
M.B. patil G Parameshwara
M.B. patil G ParameshwaraSarkarnama
Published on
Updated on

M.B. patil G Parameshwara upset : कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार विराजमान होत आहेत. उद्या (शनिवारी) त्यांचा शपथविधी सोहळा आहे.

मुख्यमंत्रीपदावरुन सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार यांच्यात सुरु असलेला वाद मिटला आहे. पण काँग्रेसमधील अजून दोन ज्येष्ठ नेत्यांची नाराजी पक्षश्रेष्ठी कशी दूर करणार याकडे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एम.बी.पाटील आणि जी. परमेश्वर हे नाराज आहेत. नाराजी व्यक्त करण्यासाठी हे दोन्ही नेते दिल्लीत पक्षश्रेष्ठींना भेटण्यासाठी आले आहेत. मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याच्या पूर्वसंध्येला या दोन नेत्यांची नाराजी पक्षश्रेष्ठींसाठी डोकेदुखी ठरणार का, हे लवकरच समजेल.

एम.बी.पाटील हे लिंगायत तर जी परमेश्वर हे दलित समाजातील आहेत. मुख्यमंत्रीपद नाही तर उपमुख्यमंत्रीपद तरी मिळावे, अशी अपेक्षा या दोन्ही नेत्यांना होती. "काँग्रेसला बहुमत मिळवण्यासाठी या दोन्ही नेत्यांचे मोठे योगदान आहे," असा दावा त्यांचे समर्थक करीत आहेत.

M.B. patil G Parameshwara
Karnataka CM Oath Ceremony: सिद्धरामय्यांच्या शपथविधीला ममता बॅनर्जी मारणार दांडी; विरोधकांची एकता कशी साधणार?

या नेत्यांकडे दुर्लक्ष केल्याच्या भावना त्यांच्या समर्थकांमध्ये आहेत. एम.बी पाटील हे काँग्रेसचे चाणक्य म्हणून ओळखले जातात. कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयात एम.बी.पाटील यांचा मोठा वाटा आहे. ते प्रचार समितीचे अध्यक्ष होते.

आमदार एम.बी. पाटील म्हणाले, "लिंगायत, दलित, वोक्कालिंगा, मुस्लिम समाजाच्या पाठिंब्यावर काँग्रेसने हा विजय मिळवला आहे. या समाजातील नेत्यांना योग्य मान सन्मान मिळाला पाहिजे,"

M.B. patil G Parameshwara
Nitesh Rane Criticized Thackeray: 'जसा पक्षप्रमुख तसे त्यांचे नेते'; राणेंनी डिवचलं, उद्धव ठाकरेंही पदं विकतात..

"दलित समाजातील व्यक्तीला उपमुख्यमंत्रीपद न देणे हे पक्षाच्या हितासाठी योग्य नाही, त्यामुळे काँग्रेसमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात," असे जी.परमेश्वर यांनी सांगितले. ते मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक होते.

काँग्रेसने 136 जागा जिंकल्या, तर भाजपला 65 जागांवर समाधान मानावे लागले. यानंतर मुख्यमंत्री कोण याचा तिढा सुटायला पाच दिवसांचा वेळ लागला. अखेर काँग्रेसकडून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. सिद्धरामय्या पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत, तर डी. के. शिवकुमार उपमुख्यमंत्री असतील.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com