Congress Vs BJP : मध्य प्रदेशातील भाजप, काँग्रेस चिंतेत; अंतर्गत सर्व्हेमुळे ताण वाढला

Madhya Pradesh Politics : अपक्ष, छोट्या पक्षांवर सत्तेची मदार अवलंबून असणार?
Congress, BJP
Congress, BJPSarkarnama

MP Vidhansabha Election : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार शिगेला पोचलेला आहे. या तापलेल्या वातावरणात दोन्ही पक्षाने मतदानापूर्वी सर्व्हे करून घेतले आहेत. या अंतर्गत सर्व्हेमुळे भाजप, काँग्रेसचे टेन्शन वाढले आहे. गेल्या निवडणुकीप्रमाणे कोणत्याच पक्षाला बहुमत मिळणार नसल्याचे सर्व्हेतून स्पष्ट होत आहे. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी भाजप, काँग्रेसला अपक्ष व अन्य छोट्या पक्षाची मदत घ्यावी लागणार आहे. परिणामी आता दोन्ही पक्षांच्या चिंतेत भर पडली आहे. (Latest Political News)

मध्य प्रदेशातील या सर्वेमुळे भाजप, काँग्रेसचे टेन्शन वाढले आहे. यावर्षीच्या निवडणुकीत कोणालाच बहुमत मिळण्याची शक्यता कमी आहे. मध्य प्रदेशातील 230 जागांसाठी निवडणूक होत आहे. येथील चुरशीच्या या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणूक निकालांमध्ये २०१८ ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाचे धाबे दणाणले आहेत.

Congress, BJP
Ajit Pawar In Katewadi : '...अन् तुमच्या आजोबांकडून मी गाय घेऊनच गेलो'; अजितदादांचा भन्नाट किस्सा

२०१८ मधील विधानसभा निवडणुकीत भाजप किंवा काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. त्यामुळे आता करण्यात आलेल्या अंतर्गत सर्वेक्षणामुळे ही या दोन्ही गटाची टेन्शन वाढले आहे. यावेळी कोणत्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही, असे यातून दिसत आहे.

या निवडणुकीत कमी अधिक मतांनी अनेक नेत्यांनाही पराभवाला सामोरे जावे लागत असल्याचे सर्व्हेतून पुढे आले आहे. त्यामुळे अनेक नेतेमंडळींची झोप उडाली आहे. २०१८ च्या निवडणूक निकालानंतर काँग्रेसला ११४ जागा मिळाल्या होत्या, तर भाजपला १०९ जागा मिळाल्या होत्या. ७ जागी अपक्ष निवडून आले होते. त्यामुळे बहुमताच्या दोन जागा कमी असलेल्या काँग्रेसने सरकार बनवले होते. त्यामुळे यावेळेस आकडे काय असणार यावर बरेच काही अवलंबून असणार आहे.

भाजप, काँग्रेसमध्ये बंडखोरी

अनेक जागांवर भाजप व काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे. या जागा कॊणाच्या पारड्यात पडतात, यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. याशिवाय काही जागी कमी मर्जीनने उमेदवार विजयी होणार असल्याने या कडे सर्वांचे असणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Congress, BJP
Dhangar Reservation : धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांना फोन लावला; पण...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com