Pune Political News : उपमुख्यमंत्री अजित पवार एखाद्या ठिकाणी दौऱ्यावर गेलेत आणि तेथील किस्सा सांगितला नाही, असे होत नाही. सत्तेत असताना किंवा नसताना आलेले अनेक अनुभव अजितदादा भाषणातून आपल्या स्टाइलमध्ये सांगत असतात. शेती-मातीशी असलेले नातेही त्यांनी अनेकदा उलगडले आहेत. असे असताना आपल्या काटेवाडी गावाला भेट दिल्यानंतर युवकांना अजितदादा जुन्या आठवणीत रमवणार नाहीत, असे होणारच नाही. या वेळी त्यांनी काटेवाडीकरांसमोर एका देखण्या गायीची आठवण काढली. (Latest Political News)
काटेवाडी येथील शिवाजीराव काटे यांच्या परिवारासोबत पवार परिवाराचे पिढ्यानपिढ्या संबंध आहेत. त्यांच्या परिवारातील युवकांनी दिवाळी उत्सवानिमित्त साकारलेल्या जंजिरा किल्ल्याच्या प्रतिकृतीची पाहणी (Ajit Pawar) अजित पवारांनी सोमवारी केली. डेंग्यू आजारातून बरे झालेल्या पवारांनी काटेवाडी येथे भेट देत ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधला.
'तुमच्या आजोबांकडे पंचक्रोशीत नाही अशी एक देखणी गावरान गाय होती. काही करून मला ती गाय घ्यायची होती. मात्र, तुमच्या आजोबांनी सांगितलेली किंमत मला परवडत नव्हती, तर मी देत असलेली रक्कम त्यांना मान्य नव्हती, पण काहीही करून गाय नेणारच असा चंग मी बांधला होता. खूप प्रयत्नानंतर तुमच्या आजोबांकडून मी ती गाय घेऊनच गेलो,' असा किस्सा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनी परिवाराला ऐकवला. या वेळी उपस्थितांनी अजितदादांना हसून दाद दिली.
शिवाजीराव काटे हे काँग्रेसचे विचारधारेचे जुने कार्यकर्ते मानले जातात. अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला शिवाजीराव काटे हे विरोधक राहिले होते. कालांतराने मात्र शिवाजीराव काटे व अजित पवार यांचे ऋणानुबंध घट्ट झाले. अजितदादांनीही या कुटुंबावर आपला लोभ कायम ठेवला. ते दरवर्षी न चुकता काटेवाडी येथील धनीवस्तीवर काटे कुटुंबाने साकारलेला किल्ला पाहण्यासाठी येतात. (Maharashtra Political News)
या वेळी अजित पवारांनी शेतीबाबत उपस्थितांकडे चौकशी केली. 'उसाचे टनेज भरते का? मक्याचा मुरघास केला आहे का? चाऱ्याची परिस्थिती बिकट असणार आहे. त्यामुळे ही काळजी आपणास घेणे आवश्यक आहे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
या वेळी छत्रपतीचे माजी संचालक शिवाजीराव दादासाहेब काटे-देशमुख, जितेंद्र काटे, शरद काटे, अनिल काटे, पोपटराव काटे, विजयसिंह काटे, संजय काटे, रणजीत काटे आदी उपस्थित होते, तर किल्ला साकारणाऱ्या नंदकिशोर काटे, योगेश काटे, आकाश काटे, संकेत काटे, महेश काटे, ओंकार काटे, विकास चांदणे, राहुल काटे या युवकांचेही अजितदादांनी कौतुक केले.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.