CM Mohan Yadav: टेक ऑफ केल्यानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांचे हेलीकॉप्टर हेलकावे खाऊ लागले! नक्की काय झाले? कुछ गड़बड़ है…

CM Mohan Yadav helicopter wobbles after takeoff in Khandwa: टेक ऑफ घेतल्यानंतर हेलिकॉप्टर पुढे जाण्या ऐवजी मागे येत होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खंडवा जिल्ह्यातील पंधाना येथे लाडकी बहीण योजना कार्यक्रमानंतर ही घटना घडली आहे.
MP CM Mohan Yadav Helicopter Moving Backwards in Khandwa
MP CM Mohan Yadav Helicopter Moving Backwards in KhandwaSarkarnama
Published on
Updated on

Viral video of MP CM helicopter moving backwards: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव एका मोठ्या हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले असल्याची माहिती समोर येत आहे. टेकऑफ दरम्यान मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर अचानक अनियंत्रित होऊन हवेत हेलकावे खाऊ लागले.

डाव्या बाजूला झुकलेल्या हेलिकॉप्टरमुळे तिथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र, वैमानिकाने दाखवलेल्या कमालीच्या प्रसंगावधानतेमुळे मोठी दुर्घटना टळली. खंडवा जिल्ह्यातील पंधाना येथे ही धक्कादायक घटना घडली.

मुख्यमंत्री पूर्णपणे सुरक्षित असून या घटनेनंतर आता व्हीआयपी सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. विविध विकास कामानंतर मुख्यमंत्री मोहन यादव परत येत असताना हा प्रकार घडल्याने अनेकांचे श्वास काही क्षण रोखले होते.

टेक ऑफ घेतल्यानंतर हेलिकॉप्टर पुढे जाण्या ऐवजी मागे येत होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खंडवा जिल्ह्यातील पंधाना येथे लाडकी बहीण योजना कार्यक्रमानंतर ही घटना घडली आहे.  हेलिकॉप्टर हेलखावे खात असतात प्रत्यक्षदर्शी 'देखो यार कैसे तिरछा आ रहा है। तिरछे ही तिरछे जा रहा है वो… तिरछे ही जा रहा है गड़बड़ है, कुछ गड़बड़ है… गड़बड़...' असे बोलत असताना व्हिडिओत ऐकू येत आहे.

MP CM Mohan Yadav Helicopter Moving Backwards in Khandwa
Maharashtra MLAs London Tour: आमदारांची लंडनवारी! सत्ताधाऱ्यांसोबत विरोधी आमदार कशाचा करणार अभ्यास?

36 सेकंट हे हेलीकॉप्टर हवेत हेलकावे खात होते. यावेळी सुरक्षा अधिकाऱ्यांनी तारांबळ उडाली. परिस्थिती लक्षात घेता पायलट ने वेग कमी केला, त्यामुळे धुळीचे लोट कमी झाले. दृश्यमानता योग्य असल्याचे लक्षात येताच पायलटने सुरक्षित ठिकाणी लँडिंग केले. त्यामुळे अपघात टळला. त्यानंतर मुख्यमंत्री भोपाळला सुरक्षितपणे पोहचले. हेलीकॉप्टरमध्ये कुठलाही यांत्रिक बिघाड झाला नव्हता, टेक ऑफ करताना दिशा आणि धुळीकण यामुळे हा प्रकार घडला. असे अनेकदा होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com