Maharashtra MLAs London Tour: आमदारांची लंडनवारी! सत्ताधाऱ्यांसोबत विरोधी आमदार कशाचा करणार अभ्यास?

List of Maharashtra MLAs visiting London for study tour: महाराष्ट्रातील १५ आमदार अभ्यास दौऱ्यासाठी लंडनला रवाना झाले आहेत. शहरी नियोजन, पायाभूत सुविधा आणि प्रशासन प्रणालीचा अभ्यास करून राज्यातील विकासकामांसाठी अनुभव वापरण्याचा उद्देश या दौऱ्यामागे आहे.
Purpose of Maharashtra MLAs London visit February 2026
Purpose of Maharashtra MLAs London visit February 2026Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : राज्यातील विधानसभा आणि विधानपरिषद आमदार लंडन दौऱ्यावर गेले आल्याची माहिती समोर आली आहे. हा अभ्यास दौरा १५ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी दरम्यान असणार आहे. विशेष म्हणजे या दौऱ्यामध्ये सत्ताधारी आमदारांसोबतच विरोधी पक्षातील आमदार देखील हातात हात घालून दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत.

विधानसभा आणि विधान परिषद यातील मिळून एकूण 15 आमदार अभ्यास दौऱ्यासाठी लंडनला रवाना झाल्या असून 22 फेब्रुवारीला हे आमदार परत फिरणार आहेत. बाबासाहेब देशमुख, परिणय फुके, विक्रम पाचपुते, नमिता मुंदडा, निरंजन डावखरे, स्नेहा दुबे, विक्रांत पाटील, अमित गोरखे, विक्रम काळे, विश्वजीत कदम, वरुण सरदेसाई, मनीषा कायंदे, सुमित वानखेडे आणि योगेश टिळेकर असे लंडन दौऱ्याला जाणाऱ्या आमदारांची नावे आहेत.

या दौऱ्यात लंडनमधील प्रशासकीय कामकाज, शहरी व्यवस्थापन आणि नागरिकांना दिल्या जाणाऱ्या विविध सुविधा यांचा अभ्यास केला जाणार आहे. असे सांगितलं जात आहे. तसेच अत्याधुनिक शहरी नियोजन, भक्कम पायाभूत सुविधा, सक्षम सार्वजनिक सेवा व्यवस्था आणि नागरिककेंद्रित प्रशासनाचा आमदारांकडून अभ्यास होणार आहे.

प्रशासकीय निर्णयप्रक्रिया आणि नागरिककेंद्रित सेवांची कार्यपद्धती यांचा अभ्यास हे आमदार करतील आणि त्याचा उपयोग राज्यातील धोरणनिर्मिती आणि शहरी व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

यापूर्वी असे अनेक परदेश दौरे झाले आहेत. हे अभ्यास दौरे कमी आणि पर्यटन दौरे जास्त ठरले आहेत. त्यामुळे या दौऱ्यामध्ये नेमका आमदार किती अभ्यास करणार आणि त्याचा नेमका किती फायदा होणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान याबाबतची माहिती देताना आमदार टिळेकर यांनी सांगितलं, महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शहरी व्यवस्थापन अधिक परिणामकारक करण्याच्या उद्देशाने आज लंडन अभ्यास दौऱ्यासाठी सहकारी आमदारांसह रवाना झालो आहे.

Purpose of Maharashtra MLAs London visit February 2026
Pune ZP President 2026: तब्बल ४८ वर्षांनंतर केंदूर-पाबळ गटाला ZP अध्यक्षपद मिळणार का? माजी सभापतींसह 14 सरपंच एकवटले

या दौऱ्यात London येथील अत्याधुनिक शहरी नियोजन, भक्कम पायाभूत सुविधा, सक्षम सार्वजनिक सेवा व्यवस्था आणि नागरिक केंद्रित प्रशासनाचा प्रत्यक्ष अभ्यास करणार आहोत. तसेच University of Wales Trinity Saint David (UWTSD) येथे सुशासन व सार्वजनिक धोरण यांवरील अभ्यासक्रमाद्वारे आधुनिक प्रशासकीय निर्णयप्रक्रिया समजून घेणार आहोत.

येथील यशस्वी मॉडेल्सचा अभ्यास करून महाराष्ट्रातील शहरांमध्ये अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन उभारण्याचा आमचा निर्धार असल्याचा टिळेकर यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com