Madhya Pradesh Election : निवडणुकीपूर्वी मध्य प्रदेशात काँग्रेसला धक्का; मोठा नेता भाजपच्या गळाला

Congress News : मध्य प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
Madhya Pradesh Election
Madhya Pradesh Election Sarkarnama
Published on
Updated on

Madhya Pradesh Assembly Elections : मध्य प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. खरगोन जिल्ह्यातील बरवाह विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार सचिन बिर्ला यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. मध्य प्रदेशमध्ये पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे.

सचिन बिर्ला यांच्या प्रवेशावेळी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, भाजप प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा आणि संघटन सरचिटणीस हितानंद शर्मा उपस्थित होते. याआधीही सचिन बिर्ला हे भाजपला पाठिंबा देताना दिसले होते. खांडवा येथील एका राजकीय कार्यक्रमात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजपच्या (BJP) बैठकीतही बिर्ला सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होत्या.

Madhya Pradesh Election
Sanjay Shirsat On Fadnavis : फडणवीसांना दिल्लीला पाठवू पाहणाऱ्या शिरसाट यांना ते कुठे पाठवतील ?

त्यानंतर रविवारी त्यांनी औपचारिकपणे भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. पक्षविरोधी कारवायांमुळे काँग्रेसने पक्षांतरविरोधी कायद्यांतर्गत त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी विधानसभेत अर्जही केला होता. मात्र, त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले नाही. गेल्या अनेक विधानसभा अधिवेशनांमध्ये सचिन बिर्ला उपस्थित नव्हते, त्यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू होत्या.

त्याचवेळी काँग्रेस सोडल्यानंतर सचिन बिर्ला म्हणाले, मी सर्व ठिकाणचा राजीनामा दिला आहे आणि मनापासून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यापुढील काळात पक्ष माझ्यावर जी काही जबाबदारी देईल ती मी पूर्ण करेल.

बिर्ला यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसच्या (Congress) नेत्या रागिणी नायक म्हणाला, त्यांना आमदारकी गमावण्याची भीती वाटत होती, त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. बिर्ला आपली आमदारकी वाचवण्यासाठी आणि आमदारकीचे पेन्शन बंद होऊ नये म्हणून इतके दिवस राहिले. आगामी काळात त्यांना भाजप प्रवेशाचे खूप दुःख होणार आहे कारण विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचाच विजय होणार असल्याचा दावा त्यांनी केला.

Edited by : Amol Jaybhaye

Madhya Pradesh Election
Thane Politics : ठाणे राष्ट्रवादीत भडका; परांजपेंनी आव्हाडांना सुनावले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com