Sanjay Shirsat On Fadnavis : फडणवीसांना दिल्लीला पाठवू पाहणाऱ्या शिरसाट यांना ते कुठे पाठवतील ?

Maharashtra Political News : फडणवीसांनी शिरसाटांच्या विधानावर मी त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करतो, अशी संयमित प्रतिक्रिया दिली होती.
Sanjay Shirsat News
Sanjay Shirsat NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena Political News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रदेश प्रवक्ते पदाची जबाबदारी सोपवल्यापासून आमदार संजय शिरसाट यांची गाडी सुसाट सुटली आहे. (Shivsena News) अगदी गल्ली ते दिल्ली अशा सगळ्याच विषयावर माध्यमांसमोर ते भाष्य करताना दिसतात. त्याला ठळक प्रसिद्धीही मिळते, त्यामुळे शिरसाटांचा काॅन्फिडन्स चांगलाच वाढला. या ओव्हर काॅन्फिडन्समध्येच त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काल एक विधान केले.

Sanjay Shirsat News
Parbhani VBA politics : `वंचित`चा करिश्मा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही दिसेल का ?

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची कॅपिसिटी पाहता त्यांना दिल्लीत पाठवलं पाहिजे, असं शिरसाट बोलून गेले. अस बोलण्यामागे त्यांचा हेतू काय होता? ते कोणाच्या सांगण्यावरून असे बोलले का? याची चर्चा सुरू असली तरी या विधानामुळे (Sanjay Shirsat) शिरसाट मात्र अडचणीत सापडले. विरोधक तर त्यांच्यावर तुटून पडले, पण त्यांच्याच पक्षाच्या काही नेत्यांनी शिरसाटांच्या विधानावर आश्चर्य व्यक्त केले.

प्रकरण अंगलट येण्याची चिन्ह आणि राज्याच्या वरिष्ठ नेत्यांनी कानउघाडणी केल्यानंतर शिरसाट यांनी आता केलेल्या विधानाबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. (Maharashtra) फडणवीस यांच्याबद्दल असलेला आदर, प्रेम यातून आपण त्यांनी दिल्लीत जावं, अशी सदिच्छा व्यक्त केल्याचे शिरसाट यांनी म्हटले आहे. माझ्या नेत्याला प्रमोशन मिळावे, या चांगल्या भावनेतून मी ते विधान केले होते.

पण विरोधकांनी त्याचे भांडवल केले, आमच्या पक्षातील नेत्यांनीही त्यावर भाष्य केले. माझ्या त्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. राज्याच्या राजकारणात कोण मुख्यमंत्री असेल, कोण दिल्लीला जाईल, याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होतो. मी बोललो म्हणजे त्याची दखल घेतली जाईल आणि फडणवीसांना दिल्लीत बोलावतील असे होत नसते, अशी सारवासारव शिरसाट यांनी केली.

फडणवीसांनी शिरसाटांच्या विधानावर मी त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करतो, अशी संयमित प्रतिक्रिया दिली होती. फडणवीसांना दिल्लीला पाठवू पाहणाऱ्या शिरसाटांना ते कुठे पाठवतील? अशी शेरेबाजीही भाजपकडून सुरू झाली आहे. शिरसाटांनी थेट फडणवीसांबद्दल विधान करून आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला, असे मत त्यांच्याच पक्षातील नेत्यांकडून व्यक्त होत आहे. शिरसाटांना या विधानाची किंमत पुढे कशी मोजावी लागेल? हे येणारा काळच ठरवेल, अशी चर्चाही दबक्या आवाजात होत आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com