Madhya Pradesh Election Result : मुख्यमंत्रिपदासाठी नवीन चेहऱ्यांची चर्चा; मोदी-शाह धक्का देणार

Election Result : गुजरात, कर्नाटक, उत्तराखंड, मणिपूर, महाराष्ट्र या राज्यांमध्ये हे राजकारण पाहायला मिळाले आहे.
Amit Shah, PM Narendra Modi
Amit Shah, PM Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Election Results 2023 : मध्य प्रदेशात भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले असून, आतापर्यंत हाती आलेली निकालानुसार पक्षाला १६४ जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर काँग्रेसला केवळ ६५ जागांवर समाधान मानावे लागणार आहे. आता मुख्यमंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह हे पुन्हा विद्यमान मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान की नव्या चेहऱ्याला संधी देणार यावरून जोरदार चर्चा सुरू आहे. (Madhya Pradesh Assembly Election 2023)

पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) आणि शाह यांच्याकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करताना अनेकदा धक्कातंत्राचा वापर करण्यात आला आहे. गुजरात, कर्नाटक, उत्तराखंड, मणिपूर, महाराष्ट्र या राज्यांमध्ये हे राजकारण पाहायला मिळाले आहे. मध्य प्रदेशातील भाजपच्या (BJP) निवडणूक प्रचारात चौहान यांचा चेहरा पुढे करण्यात आला नाही. संपूर्ण निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेवरच लढविण्यात आली. पण नंतर चौहान यांनाही पुढे करण्यात आले होते.

Amit Shah, PM Narendra Modi
Madhya Pradesh & Rajasthan Assembly Election Live Results : राजस्थान-मध्य प्रदेशात भाजपचं निर्विवाद वर्चस्व; काँग्रेसला चिंतनाची गरज!

राज्यात चौहान यांच्याविषयी काही प्रमाणात नाराजी असल्याने भाजपने दक्षता घेतली होती. ही नाराजी दूर करण्यासाठी केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर, प्रल्हाद पडेल, कैलाश विजयवर्गीय या बड्या नेत्यांना मैदानात उतरवण्यात आले. आता निवडणुकीच्या निकालानंतर या नेत्यांची नावेही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत पुढे आली आहे. एका गटाकडून केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हेही मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जात आहेत. शिंदे यांच्या ग्वाल्हेर, चंबळ भागात भाजपला भरभरून मते मिळाली आहेत.

चौहान यांची लाडली बहना ही योजना राज्यात लोकप्रिय ठरली. या योजनेसह महिलांविषयीच्या इतर योजनांमुळे भाजपला मुसंडी मारता आल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपकडून पुन्हा चौहान यांनाच संधी दिली जाऊ शकते, असाही अंदाज आहे. असे असले तरी भाजपला मिळालेले स्पष्ट बहुमत आणि आगामी लोकसभा निवडणुकांचा विचार करता मोदी-शाह यांच्याकडून सर्वांनाच धक्का दिला जाऊ शकतो.  

(Edited By - Rajanand More)

Amit Shah, PM Narendra Modi
Sunil Kanugolu : तेलंगणात रणनीतिकार सुनील कानुगोलूंचा काँग्रेसच्या विजयामध्ये 'हात' !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com