
नवी दिल्ली:'ऑपरेशन सिंदूर'बाबत माहिती देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह यांना सुप्रीम कोर्टानं चांगलेच सुनावले.शाह यांचा माफीनामा कोर्टानं स्वीकारला नाही. सुनावणी दरम्यान कोर्टानं त्यांना जोरदार फटकारलं.
तुम्ही राजकीय नेते आहेत. बोलताना शब्द काळजीपूर्वक वापरा, असे सांगत कोर्टानं त्यांचा माफीनामा स्वीकारला नाही. या प्रकरणी मंगळवारी एसआयटीची स्थापना करण्यात येणार आहे. तीन सनदी अधिकारी या प्रकरणाची चौकशी करणार आहेत, यात एका महिला अधिकाऱ्यांचा समावेश असेल. हे तीनही अधिकारी मध्य प्रदेशाच्या बाहेर असतील, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 28 मे पर्यंत अहवाल सादर करण्यास एसआयटी सांगण्यात येईल, असे न्यायालयाने म्हटलं आहे.
याबाबतचे व्हिडिओ आम्ही पाहिले आहेत. सगळा देश ऑपरेशन सिंदूरचे कौतुक करीत असताना आपण असे खालच्या स्तराचं विधानं केले आहे. आपण केलेले विधान हे लाजीरवाणे आहे, अशा शब्दात न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी विजय शाह यांचे कान उपटले . तुम्ही केलेल्या विधानामुळे तुम्हाला लाज वाटली पाहिजे, असे न्यायालयाने म्हटलं आहे.
पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतला. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांची या मोहीमेची माहिती जगाला दिली. पण सोफिया कुरैशी यांच्याबाबत मध्य प्रदेशातील कॅबिनेट मंत्री विजय शाह यांनी वादग्रस्त विधान केल्याने देशभर त्यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी दोन वेळा विजय शाह यांनी माफी मागितली आहे.
इंदूर जिल्ह्यातील मानपूर भागातील रायकुंडा गावात आयोजित एका हलमा कार्यक्रमात कुरेशी यांच्याविरोधात शाह यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांनी, ज्या दहशतवाद्यांनी आमच्या महिलांचे कुंकू पुसले, ज्यांनी आमच्या पर्यटकांना मारले, आम्ही त्यांच्याच बहिणीला त्यांच्याकडे पाठवले आणि त्यांना ठार मारले. दहशतवाद्यांनी आमच्या हिंदूंचे कपडे उतरवून मारले त्यांना मोदींनी त्यांच्या बहिणीला पाठवून उद्धवस्त केले. मोदी कपडे त्यांचे काढू शकत नव्हते, म्हणून त्यांनी त्यांच्या (दहशतवाद्यांच्या) समुदायातील एका बहिणीला पाठवून धडा शिकवला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.