Santosh Barkade : असेही आहेत आमदार; 50 लाखांचे कर्ज काढून घेतलेली जमीन रुग्णालयासाठी दान, स्वत: राहतात 2 खोल्यांच्या घरात    

Jabalpur MLA Santosh Barkade Madhya Pradesh : मध्य प्रदेशातील जबलपूरचे आमदार संतोष बरकडे यांची सध्या जोरदार चर्चा आहे.
MLA Santosh Barkade
MLA Santosh BarkadeSarkarnama

Bhopal : निवडणूक झाली की अनेक आमदारांच्या भेटीसाठी लोकांना महिनोमहिने वाट पाहावी लागते. अनेकदा तर पाच वर्षांनीच ते मतांचा जोगवा मागण्यासाठी प्रकटतात. पण असेही आमदार आहे, ज्यांना लोकांचे दु:ख पाहवत नाही. संतोष बरकडे हे नाव त्यापैकीच एक आहे.

मध्य प्रदेशातील जबलपूरमधील सिहोहा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार संतोष बरकडे सध्या चांगलेच चर्चेत आहे. त्यांनी 50 लाखांचे कर्ज काढून जमीन विकत घेतली आणि रुग्णालयासाठी दानही केली. या जमिनीवर रुग्णालयाचे कामही सुरू झाले आहे. विशेष म्हणजे हे आमदार दोन खोल्यांच्या घरात राहतात.

MLA Santosh Barkade
UK Election Results 2024 LIVE : अब की बार 400 पार! जे मोदींना जमलं नाही, ते ‘या’ नेत्यानं करुन दाखवलं...

कर्ज काढून जमीन घेण्याचा निर्णय कसा घेतला, यावर बोलताना आमदार बरकडे म्हणाले, कुंडम भागात 60 हजारांहून अधिक आदिवासी नागरीक आहेत. या भागात रुग्णालय असावे, असे अनेक वर्षांपासून वाटत होते. कोणत्याही उपचारांसाठी लोकांना 50 किलोमीटर दूर जबलपूरला जावे लागते. वेळेत उपचार न मिळाल्याने अनेकदा लोकांचा जीवही जातो.

आमदार झाल्यानंतर कुंडममध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी निधी मंजूर झाल्याचे समजले. पण आरोग्य केंद्रासाठी जमीन मिळत नव्हती. काही सहकाऱ्यांशी चर्चा करून पडरिया गावाबाहेर 50 लाखांची एक एकर जमीन विकत घेतली आणि रुग्णालयासाठी दान केली, असे बरकड यांनी सांगितले. त्यासाठी बरकडे यांनी कर्ज काढले आहे.

MLA Santosh Barkade
Nitish Kumar : तुमच्या पाया पडतो, हे काम करा! IAS अधिकाऱ्यासमोर नितीश कुमारांनी जोडले हात

पहिल्यांदाच आमदार

संतोष बरकडे पहिल्यांदाच आमदार बनले आहेत. त्यांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही, कमाईचे कोणतेही कायमस्वरुपी साधन नसून ते स्वत: दोन खोल्यांच्या घरात राहतात. मात्र, मतदारसंघातील लोकांच्या अडचणींमध्ये सातत्याने मदत करण्यासाठी आघाडीवर असतात. प्रामुख्याने आरोग्याच्या सुविधेसाठी ते आग्रही असतात. त्यातूनच त्यांनी कर्ज काढून जमीन खरेदी केली.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com