Narayan Singh Kushwaha : ...म्हणून नवऱ्यांना दारु घरी आणून प्यायला सांगा; भाजप मंत्र्याचा महिलांना अजब सल्ला

Minister Narayan Singh Kushwaha Viral Video : मध्य प्रदेशात दारूच्या व्यसनाला आळा घालण्यासाठी तसंच दारूचं व्यसन सोडवण्यासाठी एका कार्यक्रमात बोलताना मंत्री नारायण सिंह कुशवाहा यांनी महिलांनी अजब सल्ला दिला आहे.
Narayan Singh Kushwaha
Narayan Singh KushwahaSarkarnama

Madhya Pradesh News, 29 June : दारुचं व्यसन हे अनेक कुटुंब उद्ध्वस्त करण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे सरकारने प्रत्येक राज्यात दारुबंदी करावी अशी महिलांची आग्रही मागणी असते. शिवाय अनेकदा दारुबंदीसाठी महिला आंदोलनं देखील करत असतात. मात्र, तरीही अद्याप अनेक राज्यांमध्ये सरसकट दारुबंदी करण्यात आलेली नाही.

तर ज्या राज्यांमध्ये दारुबंदी करण्यात आली आहे, तिथे ती यशस्वी कशी करायची? हा मोठा प्रश्न प्रशासनासमोर असतो. शिवाय दारूबंदी केल्यानंतर बंदी असणाऱ्या भागात चढ्या दराने दारूविक्री केल्याचीही अनेक प्रकरणं समोर येत असतात. दारुबंदी करण्यासाठी आणि दारुचे व्यसन सोडवण्यासाठी अनेकजण वेगवेगळे उपाय सांगत असतात.

अशातच आता मध्य प्रदेशचे (Madhya Pradesh) सामाजिक न्याय व कल्याण मंत्री नारायण सिंह कुशवाहा (Narayan Singh Kushwaha) यांनी नवऱ्याचं दारुचं व्यसन कसं सोडवायचं? याबाबतचा अजब सल्ला महिलांना दिला आहे. त्यांनी दिलेला हा सल्ला सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. मध्य प्रदेशात दारूच्या व्यसनाला आळा घालण्यासाठी तसंच लोकांचं दारूचं व्यसन सोडवण्यासाठी एका कार्यक्रमात बोलताना मंत्री नारायण सिंह कुशवाहा यांनी महिलांनी नवऱ्याला घरी येऊन दारू पिण्याचा आग्रह करण्याचा सल्ला दिला आहे.

Narayan Singh Kushwaha
Pune Police : पुण्याचे पोलिस आयुक्त RSS संबंधित ते फडणवीसांची चमचेगिरी करतात; कुणी केला आरोप?

यावेळी बोलनाता मंत्री म्हणाले, "सध्या राज्यात दारू बंदी आहे. पण पिणारे ऐकत नाहीत. अजूनही पीत आहेत. मात्र, दारूबंदीच्या उपक्रमात महिलांचं मोठं योगदान आहे. घरातल्या महिलांनी नवऱ्याची दारू बंद करायचं ठरवलं तर त्या हे साध्य करू शकतात. यासाठी त्यांनी नवऱ्यांना सागायला पाहिजे की, तुम्ही बाहेर कुठेही दारू न पिता दारू घरी घेऊन या आणि जेवल्यानंतर माझ्यासमोर ती प्या." असं कुशवाहा यांनी म्हटल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे.

Narayan Singh Kushwaha
Eknath Shinde : "आमच्या बेट्याचं काय करायचं ते पाहू, तुमचा लाडला बेटा वर्षावर बंगल्यावर बसून..."

तर मंत्री महोदयांनी आपण महिलांना असा सल्ला का दिला याच स्पष्टीकरण देखील व्हिडीओमध्ये दिलं आहे. ते म्हणाले, "तुमचा नवरा तुमच्यासमोर दारू प्यायला लागला तर त्यांचं दारू प्यायचं प्रमाण कमी होत जाईल आणि हळूहळू ते पूर्ण बंद होईल. कारण त्याला बायको किंवा मुलांसमोर दारू पित असल्याची लाज वाटेल आणि तो दारु बंद करेल. शिवाय महिलांनी नवऱ्याला सांगितलं पाहिजे की, तुमची मुलं दारू पिऊ लागती तर त्यांचे काय हाल होतील? असे प्रश्न नवऱ्याला विचारले तर त्याची दारू पूर्णपणे बंद होईल हे निश्चित आहे. मात्र, या सगळ्यामध्ये महिलांचं मोठं योगदान असेल."

दरम्यान, मंत्री कुशवाहा यांनी महिलांना अनोखा सल्ला दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसनं (Congress) त्यावर टीका केली आहे. नारायण कुशवाहा यांचा सल्ला चांगला असला तरी सांगण्याची पद्धत चुकीची आहे. शिवाय घरात दारू पिणं हे आगामी वादांच कारण ठरु शकतं. त्यातून कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनाही वाढू शकतात, त्यामुळे त्यांनी फक्त दारु न पिण्याचं आवाहन करायला पाहिजे होतं, असं काँग्रेसचे मीडिया सेलचे अध्यक्ष मुकेश नायक यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com