Pune News : राज्य सरकारकडून 'लाडकी बहीण' योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेवरून विरोधकांकडून राज्य सरकारवर निशाणा साधण्यात येत आहे. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav thackeray ) यांनी त्यांच्या काळात फक्त 'लाडला बेटा' योजना चालवली असल्याची टीका केली होती.
त्याला आता शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. पुणे दौऱ्यावरती असताना संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी माध्यमांशी संवाद साधला.
महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा द्यावा, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केला होता. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडी हाच आमचा चेहरा असल्याचं स्पष्ट केला आहे. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राऊत म्हणाले, "महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला पूर्ण बहुमत मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे. लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत, हे निश्चित झालं असतं तर वीस ते पंचवीस जागा नक्कीच वाढल्या असत्या. कोणतीही निवडणूक ही बिन चेहऱ्याची असू नये. कोणासाठी मतदान करतोय हे लोकांना माहिती असलं पाहिजे. लोकांनी इंदिरा गांधींना, मोदींना मतदान केलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असावा याबाबत मी ठाम आहे. आगामी महाविकास आघाडीच्या बैठकीत सर्व नेते एकत्रित बसून याबाबत निर्णय घेऊ."
"महाविकास आघाडीचे तीनही पक्ष एकत्र लढल्यानंतर काय होतं, हे चित्र लोकसभा निवडणुकीत दिसलं आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुका एकत्रित लढणार हे निश्चित आहे. विधानसभेच्या आम्ही 175 ते 180 जागा जिंकू याची आम्हाला खात्री आहे," असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला.
"देवेंद्र फडणवीसांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. राज्याच्या जनतेने त्यांचं नेतृत्व, पक्ष आणि त्यांनी केलेल्या आघाड्यांना झिडगारून लावलं आहे. ते स्वतःला नाना फडणीसांचे मोठे भाऊ समजत होते. मात्र, तसं नाहीये नाना फडणीस हे साडेतीन शहाण्यांपैकी एक होते मात्र फडणवीस साडेतीन शहाण्यांपैकी एक नाहीत," अशी टीका राऊत यांनी फडणवीस यांच्यावर केली.
"एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या 'लाडला बेट्या'विषयी बोलावं. ते सध्या सरकारमध्ये हस्तक्षेप करत आहे. आम्ही आमच्या बेट्याचं काय करायचं ते पाहू. तुमचा लाडला बेटा वर्षावर बंगल्यावर बसून ज्या पद्धतीने पोलिस प्रशासन आणि बिल्डर यांच्याशी मधुर संवाद साधून पुढील निवडणुकीसाठी ही बोलणी करत आहे. त्याविषयी बोलावं," असा टोला राऊत यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.