
चॅम्पियन ट्रॉफी 2025च्या अंतिम सामन्यात भारतीय टीमने न्यूझिलंडला पराभूत करून विजेतेपट पटकावले आहे. विशेष म्हणजे भारतीय संघ संपूर्ण मालिकेत एकही सामना हारलेला नाही. तर या संपूर्ण मालिकेदरम्यान भारताचा कर्णधार आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांच्यावर लोकांकडून केल्या गेलेल्या टिप्पण्यांची बरीच चर्चा झाली.
आता मध्य प्रदेशचे क्रीडामंत्री विश्वास सारंग यांनी एक मोठा आरोप केला आहे. त्यांनी म्हटले की, चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्याच्याआधी रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीचे मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला होता.
मध्यप्रदेशच्या क्रीडामंत्र्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, अंतिम सामन्याआधी रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीचे मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न कोणी केला होता? रोहित शर्माला खचवण्यासाठी त्याच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित केले गेले. तर मोहम्मद शमीला त्याच्या धर्मात बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला, हे षडयंत्र होते का?
तसेच मध्यप्रदेशच्या क्रीडमंत्र्यांनी म्हटले की, भारताच विजय त्या शक्तींना चपराक आहे, जे हिंदुस्थानचा मान आणि सन्मान जगभरात खाली नेण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी म्हटले की रोहित शर्मा(Rohit Sharma) आणि मोहम्मद शमीने व ११ खेळाडूंच्या संघाने त्या लोकांना चपराक लगावली आहे, ज्यांनी त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी म्हटले की आजचा विजय अभिमानाची बाब आहे.
काँग्रेसच्या(Congress) राष्ट्रीय प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी रोहित शर्माला जाड आणि अप्रभावी कर्णधार म्हटले होते. या विधानावरून बराच वादंग झाला होता. तेच जलद गोलंदाज मोहम्मद शमी सामन्या दरम्यान एनर्जी ड्रिंक पीताना दिसला होता. ज्यावरून एका मौलानांनी त्यांच्यावर टीका केली होती. रमजानच्या महिन्यात रोजा न ठेवून शमीने खूप मोठा गुन्हा केला आहे, असं त्यांनी म्हटलं होतं.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.