Prayagraj Mahakumbh Mela : देशातील सर्वात महत्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेल्या प्रयागराजमध्ये (उत्तरप्रदेश) आजपासून महाकुंभ मेळाव्यास सुरवात होत आहे. 45 दिवस सुरु असलेल्या या कुंभमेळ्याला यंदा फार महत्व आहे. १४४ वर्षांनंतर होणाऱ्या दुर्मीळ ग्रहस्थितीमुळे या कुंभमेळ्याला विशेष महत्व आहे. देश आणि जगभरातून भाविकांची पावलं प्रयागराजकडे वळत आहे.
'अॅपल'चे सहसंस्थापक दिवंगत स्टीव जॉब्स यांची पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स या कुंभमेळ्याला आल्या आहेत. त्यांना त्यांचे गुरु निरंजनी आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर कैलाशानंद गिरी महाराज यांच्याकडून गोत्र मिळाले आहे, लॉरेन्स यांचे नवं नाव मिळालं आहे. कुंभमेळ्यात लॉरेन्स या संन्यासी म्हणून सहभागी झाल्या आहेत. त्यांना कमला हे नाव कैलाशानंद गिरी दिलं आहे.
प्रयागराज महाकुंभमेळाव्यात लॉरेन अर्थात 'कमला'या सनातन धर्म समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. कुंभमेळ्यातील विविध कथा आणि प्रवचन कार्यक्रमात त्या सहभागी होणार आहेत. लॉरेन जॉब्स यांना सनातन धर्माबाबत अधिक रुची आहे. त्या माझ्या मानसकन्या आहेत. त्यांना कमला हे नाव दिले असल्याचे कैलाशानंद गिरी महाराज यांनी सांगितलं. त्या दुसऱ्यांदा भारतात आल्या आहेत. कैलाशानंद गिरी महाराज यांना त्या गुरु मानतात.
कैलाशानंद गिरी महाराज यांच्या सोबत कमला यांनी वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिराचे दर्शन घेतले. "ही वेगळी पुरातन परंपरा आहे, जगभरातील नागरिक आता साधू-संतांना भेटण्यासाठी येत आहेत. जगातील श्रीमंत महिला आज कुंभमेळ्यात एक सामान्य व्यक्ती, संन्यासी म्हणून राहत आहेत," असे कैलाशानंद गिरी महाराजयांनी सांगितलं.
लॉरेन जॉब्स या कुंभमेळाव्यात अन्य कुणालाही भेटण्यास उत्सुक नसून त्या फक्त आपल्य गुरुकडून सनानत धर्माबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आल्या आहेत. हा मेळा आजपासून (१३ जानेवारी) सुरू होऊन २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. हिंदू धर्मात विशेष धार्मिक महत्त्व असलेला हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. प्रयागराज जिल्हा प्रशासनाकडून महा कुंभ मेळ्यात शाही स्नानासाठी महत्त्वाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
13 जानेवारी 2025 – पौष पौर्णिमा
14 जानेवारी 2025 – मकर संक्रात
29 जानेवारी 2025 – मौनी अमावस्या (सोमवती)
3 फेब्रुवारी 2025 – वसंत पंचमी
12 फेब्रुवारी 2025 – माघी पौर्णिमा
26 फेब्रुवारी 2025 – महाशिवरात्र
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.