Mahanaaryaman Scindia Started My Mandi : राजघराण्याचा वंशज, केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा विकतोय फळे-भाजीपाला..

arted My Mandi : ग्वाहेर येथील जय विलास महालात महाआर्यमन हे वास्तव्यास आहेत.
Mahanaaryaman Scindia Started My Mandi
Mahanaaryaman Scindia Started My Mandi Sarkarnama
Published on
Updated on

My Mandi : भारतीय राजकारणात इंदिरा गांधी यांनी घराणेशाही रुजवली. त्यांचे अनुकरण करत नंतर इतरही पक्षांमध्ये घराणेशाही फोफावली. त्यामुळे लोकशाही तत्त्वे तसेच शासन-प्रशासनाची धुरा वाहण्यासाठी लायक आणि सक्षम नेतृत्व सत्तास्थानी यायला हवे, या गृहितकालाच हरताळ फासला गेला. घराणेशाहीला कुठलाही पक्ष अपवाद ठरत नाही.

एकीकडे घराणेशाहीवर टीका होत असताना दुसरीकडे मध्यप्रदेशातील राजकारणातील शिंदे घराणे याला अपवाद ठरलं.. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांचे सुपुत्र, ग्वाल्हेर घराण्याचे वासरदार महाआर्यमन शिंदे यांनी राजकारणाकडे पाठ फिरवून उद्योगक्षेत्रात पाऊल ठेवलं आहे.

महाआर्यमन शिंदे यांनी कृषीक्षेत्रात स्टार्टअप सुरु केलं आहे. सुर्यांश राणा यांच्यासोबत महाआर्यमन यांनी २०२२ मध्ये कृषी स्टार्टअप 'मायमंडी'सुरु केली.

संगीताचा आवड

महाआर्यमन शिंदे यांनी गेल यूनिवर्सिटीतून पदवी संपादन केली आहे. पदवी शिक्षणानंतर त्यांनी बोस्टन कंसल्टिंग ग्रुपसोबत त्यांनी काम केलं. महाआर्यमन शिंदे यांना संगीत आणि विविध खाद्य पदार्थांचा आस्वाद घेण्याची आवड आहे.

संगीताचा आवड जोपासत त्यांनी 'केंबेल' नावाचा संगीत महोत्सव सुरु केला होता. त्यांनी 'प्रवास'या नावाचा सांस्कृतिक उपक्रम सुरु केला होता. संगीत महोत्सवात सहभाग घेण्यासाठी ७५ हजारापासून ते दोन लाखापर्यंतचे शुल्क आकारले जात होते

Mahanaaryaman Scindia Started My Mandi
Rohit Pawar Tweet: वळसे-पाटील साहेब, अजून काय पाहिजे ? ; रोहित पवारांचा सवाल ; साहेबांचा तुमच्यावर सर्वाधिक विश्वास..

'मायमंडी'

त्यानंतर महाआर्यमन शिंदे यांनी 'मायमंडी' सुरु केली. त्यांनी कृषी स्टार्टअपच्या माध्यमातून आँनलाईन फळ-भाजी विकण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. या व्यवसायात मोठ्या प्रमाणात उलाढात होत आहेत. मोठ्या प्रमाणात फळ-भाज्यांची विक्री केली जाते. या कंपनीची उलाढाल महिन्याला एक कोटी रुपये आहे. जयपूर, नागपूर, ग्वाल्हेर, आग्रा या शहरात या कंपनीची सेवा उपलब्ध आहे.

Mahanaaryaman Scindia Started My Mandi
Chhagan Bhujbal On NCP Crisis: राष्ट्रवादी का फुटली? छगन भुजबळांनी सांगितलं कारण..; सातत्याने शब्द फिरवल्यामुळे...

राजमहालात ४०० खोल्या..ग्वाल्हेरचे राजघराणे..

ग्वाहेर येथील जय विलास महालात महाआर्यमन हे वास्तव्यास आहेत. या विलासी राजमहालात ४०० खोल्या आहेत. त्यांची किंमत चार हजार कोटी रुपये आहे. १८७४ मध्ये सुमारे दीड कोटी रुपये खर्च करुन हा राजवाडा बनविण्यात आला होता. महाआर्यमन यांचे वडील ज्‍योतिरादित्‍य हे सध्या मोदी सरकारमध्ये केंद्रीयमंत्री आहेत. त्यांची एकूण संपत्ती ही ३७९ कोटी रुपये आहे. ज्योतिरादित्य हे ग्वाल्हेरच्या राजघराण्याचे वंशज आहेत. त्यांचे आजोबा जिवाजीराव शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे शेवटचे राजे होते.

ज्योतिरादित्य यांनी केंद्रात काँग्रेसप्रणित आघाडीचं सरकार असताना मंत्री म्हणून कारभार पाहिला आहे. 2007, 2009 आणि 2012 मध्ये ते मंत्रिपदी होते. 2007 मध्ये त्यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान आणि कम्युनिकेशन विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. 2009 मध्ये त्यांच्याकडे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचा कारभार सोपवण्यात आला. काही काळ ते ऊर्जामंत्रीसुद्धा होते.पक्षाविरोधी कृत्यामुळे ज्योतिरादित्य यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी 'कमळ'हाती घेतलं.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com