Maharashtra Live Updates : SEBCतील10 टक्के आरक्षणाचे काय होणार?, आज सुनावणी

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...
Maharashtra Political Live updates
Maharashtra Political Live updatesSarkarnama

Tuljabhavani Mandir: तुळजाभवानी देवीचे 'व्हीआयपी' दर्शन महागले

शारदीय नवरात्र उत्सव काळात तुळजाभवानी देवीचे व्हीआयपी दर्शन महाग होणार आहे. व्हीआयपी दर्शनाच्या पासच्या किमतीत वाढ 20 सप्टेंबर पासून वाढ करण्यात आली आहे. दोनशे रुपयांचा देणगी दर्शन पास तीनशे रुपयांना मिळणार, तर पाचशे रुपयांच्या देणगी दर्शन पास 1000 रुपयांना मिळणार आहे. स्पेशल गेस्ट रेफरल पासची किंमत ही दोनशे रुपयावरून वाढ होऊन पाचशे रुपये करण्यात आली आहे. सकाळच्या अभिषेक पासची संख्या तीनशेवरून चारशे करण्यात आली आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून परिपत्रक काढून नवे दर जाहीर करण्यात आले आहे.

SEBC Reservation live: दोन्ही याचिकांवर बाजू मांडणार

SEBC आरक्षणावर मुंबई हायकोर्टात आज सुनावणी होणार आहे. SEBCतील10 टक्के आरक्षणाचे काय होणार? याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. हैदराबाद गॅझेटचा जीआर राज्य सरकारने काढला आहे, मात्र यापूर्वीच मराठा समाजाला SEBC प्रवर्गातून 10 टक्के आरक्षण दिलं आहे. त्याला हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे. आरक्षणविरोधी आणि आरक्षणाच्या बाजूच्या अशा दोन्ही याचिकांवर आज सुनावणी होणार आहे.

देवेंद्र फडणवीस यवतमाळ येथे दाखल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यवतमाळ येथे दाखल झाले आहेत. ते आदिवासी विकास विभागाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही - अजित पवार

मराठा समाजाला आरक्षणाचा हक्क देतांना कोणत्याही परिस्थितीत ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे. लातूर जिल्ह्यातील भरत कराड नावाच्या तरुणाने आत्महत्या केल्यानंतर ट्वीट करत ओबीसी समाजाला अजित पवारांनी आश्वासन दिलं आणि कराड यांना श्रद्धाजंली अर्पन केली. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं की, लातूर जिल्ह्यातील वांगदरी (ता. रेणापूर) येथील श्री. भरत महादेवराव कराड यांनी ओबीसी आरक्षणाच्या चिंतेतून मांजरा नदीपात्रात उडी घेऊन जीवन संपवल्याची घटना अत्यंत दुःखद आणि मन हेलावणारी आहे. सर्वप्रथम त्यांच्या आत्म्यास मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आपलं सरकार सर्व समाज घटकांच्या न्याय व हक्कांसाठी कटिबद्ध आहे. मराठा समाजाला आरक्षणाचा हक्क देतांना कोणत्याही परिस्थितीत ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, याची आम्ही पूर्ण खबरदारी घेत आहोत. त्यामुळे या संवेदनशील काळात कुणीही टोकाची भूमिका घेऊ नये, अशी मी सर्वांना विनंती करतो. प्रत्येक समाजाच्या हितासाठी आम्ही काम करत असून कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही, हीच आमची भूमिका आहे. या दुःखद प्रसंगी मी कराड कुटुंबीय आणि त्यांच्या आत्मीयांच्या दुःखात सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याचं बळ देवो, हीच प्रार्थना.

Nepal : अखेर नेपाळच्या पंतप्रधानपदाचा पेच सुटला; सुशीला कार्की नव्या पंतप्रधान

पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्या राजीनाम्यानंतरआता नेपाळच्या माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की हंगामी सरकारचे नेतृत्व करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. राष्ट्रपती कार्यालयाने नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांच्या कारकिर्दीसाठी व्यापक आदर असलेल्या 73 वर्षीय कार्की यांना नेपाळ पहिल्या महिला पंतप्रधान बनणार असल्याचं जाहीर केलं आहे.

Shivsena UBT : मातोश्रीवर आज आमदार खासदारांची बैठक

उद्धव ठाकरे आमदार खासदारांशी संवाद साधणार आहेत. राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये झालेल्या भेटीनंतर आज मातोश्रीवर आमदार खासदारांची बैठक बोलावल्यामुळे या बैठकीत युती संदर्भात चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Shivsena UBT : पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामना म्हणजे राष्ट्रद्रोहच..., ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल

रविवारी 14 सप्टेंबरला आशिया कप 2025 स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्याला ठाकरेंत्या शिवसेनेकडून विरोध करण्यात आला आहे. पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामना म्हणजे पहलगामनंतरचा आणखी एक भयंकर ‘दहशतवादी’ हल्ला आहे. हा राष्ट्रद्रोहच आहे, असं शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनात म्हटलं आहे. जोपर्यंत कश्मीरात हिंदूंचे रक्त तुम्ही सांडत आहात तोपर्यंत पाकिस्तानबरोबर क्रिकेट होणार नाही. दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र चालणार नाही!’’ असे ठणकावून सांगणारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कुठे आणि पाकिस्तानशी क्रिकेटची सलगी करणारे आजचे नकली हिंदुत्ववादी कोठे? भारताचा स्वाभिमान आणि कुंकवाच्या प्रतिष्ठेसाठी जनतेला लढावेच लागेल, असंही सामनामध्ये लिहिलं आहे.

Narendra Modi manipur Visit : PM नरेंद्र मोदी आज मणिपूर दौऱ्यावर

मणिपूरमध्ये मेईतेई आणि कुकी जमातींमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहिल्यांदाच मणिपूर दौऱ्यावर जाणार आहेत. ते या दौऱ्यात 7 हजार 300 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com