Assembly Election : महाविकास आघाडीला मोठा धक्का; लोकसभेत साथ देणारा पक्ष स्वबळावर लढणार...

AAP Mahavikas Aghadi Maharashtra : आम आदमी पक्षाने महाविकास आघाडीला महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत पाठिंबा दिला होता.
Mahavikas Aghadi
Mahavikas AghadiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीत आघाडीला खंबीरपणे साथ दिलेल्या आम आदमी पक्षाने विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीचा पराभव केला. देशातही इंडिया आघाडीच्या माध्यमातून विरोधकांनी एनडीएला जेरीस आणले. पण या निवडणुकीनंतर प्रामुख्याने आपने विविध राज्यांमध्ये आघाडीसोबत न राहण्याचा निर्णय घेतला आहे. तसाच निर्णय महाराष्ट्रातही घेण्यात आला आहे.

Mahavikas Aghadi
Video Nilesh Lanke : आधी आंदोलन, आता निलेश लंकेचे लोकसभेतही दणक्यात भाषण; नगरसाठी मोठी मागणी...

पक्षाच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी सोमवारी ही घोषणा केली. त्यांनी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत समावेशाबाबत सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत. राज्यात पक्ष स्वबळावर लढणार असून मुंबईतील सर्व 36 मतदारसंघात उमेदवार उभे केले जातील, असे मेनन यांनी स्पष्ट केले.

इंडिया आघाडी केवळ लोकसभा निवडणुकीपुरतीच मर्यादीत होती. ही आघाडी राष्ट्रीय पातळीवर कायम राहील. पण राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. आप हा राष्ट्रीय पक्ष असून दिल्लीसह पंजाबमध्ये सत्ता आहे. तसेच गोवा आणि गुजरातमध्येही पक्षाचे आमदार असल्याचे मेनन यांनी सांगितले.

Mahavikas Aghadi
Video Kalyan Kale : लोकसभेत कल्याण काळे थांबेनात, अध्यक्षही थकले; शेवटी माईक बंद करावा लागला...

सध्याचे महाराष्ट्रातील महायुती सरकारकडे कल्याणकारी योजना राबवण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती नाही. होलसेल भ्रष्टाचारात ते व्यस्त असून पुन्हा सत्तेत येणार नाही, अशी टीकाही मेनन यांनी केली. भाजप हा महाराष्ट्र आणि मुंबई विरोधी पक्ष आहे. तर एकनाथ शिंदे सरकारकडे लोकांच्या कल्याणासाठी वेळ नाही, असेही त्या म्हणाल्या.

महाराष्ट्र आणि येथील लोकांना सर्वकाही चांगल्या गोष्टी मिळायला हव्यात. आम आदमी पक्ष हा पर्याय नसून त्यावरील उपाय आहे, असे आपचे कार्यकारी अध्यक्ष रुबेन मास्कारेन्हास म्हणाले. दरम्यान, आपच्या या भूमिकेमुळे आघाडीला धक्का बसला आहे. महाराष्ट्रात आपचा एकही आमदार नसला तरी मुंबईसह अन्य काही भागांत पक्षाने चांगली बांधणी केली आहे. त्यामुळे काही मतदारसंघात आपमुळे आघाडीला दणका बसू शकतो, अशी चर्चा आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com