Narendra Modi : पंतप्रधान मोदींचे ओबीसी कार्ड; म्हणाले, एक है तो सेफ है!

Narendra Modi in Nashik: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी धुळ्यानंतर नाशिकमध्ये दुसरी प्रचारसभा झाली.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नाशिक येथील प्रचार सभेत काँग्रेस व मित्रपक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. भाषणादरम्यान त्यांनी काँग्रेस ओबीसींमध्ये फूट पाडत असल्याचा आरोप केला. ओबीसींमध्ये फूट पडल्याशिवाय सत्ता मिळणार नाही, अशी काँग्रेसचा धारणा आहे, असे निशाणा साधत मोदींनी ‘एक है तो सेफ है’ चा नारा दिला.

धुळ्यातील सभेत मोदींनी आदिवासींचा मुद्दा उपस्थित केला होता. नाशिकमध्ये त्यांनी ओबीसीच्या मुद्द्यावर अधिक जोर दिला. ते म्हणाले, काँग्रेसने राजकारणात स्वत:ला वाचवण्यासाठी आपले सर्वात मोठे शस्त्र चालवले आहे, ते शस्त्र म्हणजे, एससी, एसटी, ओबीसी समाजातील एकता तोडणे. काँग्रेसचे लोक दलितांमध्ये, एसटी, ओबीसींमध्ये फूट पाडू इच्छित आहेत.

PM Narendra Modi
Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा फडणवीसांना शब्द; निवडणुकीनंतर त्यांची ‘ही’ इच्छा पूर्ण करणार...

1990 मध्ये जेव्हा ओबीसी एकजूट झाले, तेव्हा भारतात त्यानंतर काँग्रेसचे पूर्ण बहुमताचे सरकार बनणे बंद झाले. त्यामुळे काँग्रेसला त्याचा राग आहे. ओबीसी समाजाला कमजोर करणे, एकजुटतेला संपवायचे आहे. ओबीसींमध्ये फूट पाडू इच्छित आहे, तर त्यांना सत्ता मिळेल, असे त्यांना वाटते. ओबीसींमधील सगळ्या जातींना आपआपसांत लढवू इच्छित आहे, असे मोदी म्हणाले.

तुमच्या एकजुटतेला संपवण्यासाठी काँग्रेस मैदानात उतरली आहे. तुमच्या एकतेची काँग्रेसला अडचण आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, हम एक है तो सेफ है. काँग्रेस ओबीसी समाजाच द्वेष करते. ओबीसी समाजातील एक व्यक्ती तिसऱ्यांदा देशाचा पंतप्रधान बनली आहे. काँग्रेसला हे पचत नाही. त्यांची झोप उडाली आहे. त्याचा राग ओबीसी समाजावर काढत असल्याची टीका मोदींनी केली.

PM Narendra Modi
PM Narendra Modi : भारत, संविधान की शेतकरी..! भाषणाचा विक्रम मोडताना मोदींचा कोणत्या शब्दांवर होता भर? जाणून घ्या...

काँग्रेसची पोलखोल

काँग्रेस आणि त्यांचे साथीदार केवळ दिखाव्यासाठी रिकाम्या पान्यांचे संविधान असलेले पुस्तक घेऊन फिरतात. काल त्यांची पोलखोल झाली. जेव्हा संविधानाच्या रक्षणाची, सन्मानाची बाब येते तेव्हा हे उलटे काम करतात. काँग्रेसने 75 वर्षे जम्मू आणि काश्मीरमध्ये आंबेडकरांच्या संविधानाला लागू होऊ दिले नाही.

आम्ही कलम 370 हटवून एक देश एक संविधान लागू केले. जम्मू आणि काश्मीर विधानसभेत काँग्रेस आणि आघाडीने कलम 370 पुन्हा लागू करण्यासाठी ठराव करतात. त्यांना तिथून संविधान हटवायचे आहे. जेवढे काँग्रेस दोषी तेवढेच त्यांचे साथीदारही दोषी असल्याचे मोदी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com