Panaji News: महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन होत आहे. महायुतीच्या यशात घटकपक्षाबरोबरच अनेक नेत्यांचाही मोठा सहभाग आहे. विधानसभेच्या प्रचारासाठी गोव्यातून भाजपच्यावतीने मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजीत राणे हे आले होते. त्यांच्या घेतलेल्या सभा उमेदवारांसाठी लाभदायी ठरल्या.
सावंत यांनी २२ पैकी २१ आणि राणे यांनी प्रचार केलेल्या १२ पैकी ११ ठिकाणचे उमेदवार निवडून आले आहेत. प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांनीही कोकण पट्ट्यात मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला होता आणि तेथील उमेदवारही निवडून आले आहेत.
कोल्हापूर दक्षिण, सांगली, जत, पलूस कडेगाव, चंदगड, राजापूर लांजा, अक्कलकोट, सोलापूर उत्तर,दक्षिण कराड, सातारा, चिंचवड, पुणे, नांदेड, लातूर, संभाजीनगर, अमरावती, हातकणंगले, इचलकरंजी, हुपरी, नागपूर, अकोला याठिकाणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उमेदवारांचा प्रचार केला.
एक मतदारसंघ वगळता भाजपच्या उमेदवारांसाठी सावंत यांनी केलेला प्रचार लाभदायी ठरला असल्याचे दिसून येते. सांगली मतदारसंघात त्यांनी भाजपच्या सुधीर गाडगीळांसाठी प्रचार केला, तेथे सावंत प्रभावी ठरल्याचे दिसते.
सावंत यांच्या प्रचारसभा आणि रॅलीचे आयोजन केले होते. सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पलूस-कडेगाव याठिकाणी विश्वजित कदम यांच्याविरोधात भाजप उमेदवारांसाठी केलेला प्रचार प्रभाव पाडू शकला नाही, असे दिसून आले.
माजी मंत्री पतंगराव कदम यांचा या मतदारसंघावर प्रभाव आहे आणि त्यांच्या पश्चात त्यांचे सुपूत्र विश्वजित कदम हेच या मतदारसंघातून २०१८, २०१९ व २०२४ असे सलग तीनवेळा निवडून आले आहेत.
कोकणातील मतदारसंघात मंत्री विश्वजित राणे यांनी महायुतीच्या १२ उमेदवारांचा प्रचार केला, त्यातील ११ उमेदवार निवडून आले आहेत. राणे यांनी प्रचार केलेल्या मतदारसंघांमध्ये दापोली, गुहाघर, चिपळूण,पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी येथे प्रचार केला. गुहागर येथील महायुतीचा उमेदवार पराभूत झाला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.