Akhilesh Yadav : अखिलेश यादव महाराष्ट्रात येऊन ‘एक घाव दोन तुकडे’ करणार; चेंडू ‘मविआ’च्या कोर्टात

Maharashtra Assembly Election Samajwadi Party : महाविकास आघाडीमध्ये समाजवादी पक्षानेही मुंबईसह राज्यात इतर ठिकाणी जागांची मागणी केली आहे.
Akhilesh Yadav
Akhilesh YadavSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र, समाजवादी पक्षाला आघाडीत किती जागा मिळणार, याबाबत अद्यापही संभ्रम आहे. पक्षाचे नेते अबू आझमी यांनी आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. यापार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव शुक्रवारी महाराष्ट्रात येणार आहे.

आघाडीमध्ये सन्मानपूर्वक स्थान मिळावे, असा समाजवादी पक्षाचा आग्रह आहे. त्यांच्याकडून मुंबईसह राज्यातील इतर काही जागांवर दावा सांगण्यात आला आहे. पण आघाडीकडून जागावाटपाच्या चर्चेला बोलावले जात नसल्याचा आरोप सपाच्या नेत्यांकडून केला जात आहे.

Akhilesh Yadav
Citizenship Act : स्थलांतरित बांग्लादेशींच्या नागरिकत्वाबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल; कलम 6A ठरवले वैध

आझमी यांनी गुरूवारी सोशल मीडियात एक पोस्ट करत आक्रमक पवित्रा घेतला होता. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष किंवा उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेने आमच्याशी चर्चा न करता उमेदवारी यादी जाहीर केली तर ते समाजवादी पक्षाला आघाडीचा मित्रपक्ष मानत नाही, असे आम्ही समजू. पक्षाला विश्वासात न घेता उमेदवार जाहीर करणे चुकीचे आहे. अशा स्थितीत राज्यातील अधिकाधिक जागांवर निवडणूक लढण्याची परवानगी अखिलेश यादव यांनी द्यावी, असे सूचक विधान आझमी यांनी केले आहे.

दरम्यान, आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आलेले असतानाच अखिलेश हे शुक्रवारी महाराष्ट्रात येणार आहे. या दौऱ्यात ते जागावाटपात आपल्या पक्षाला अधिकाधिक जागा मिळवण्याचा प्रयत्न करतील. याविषयी मीडियाशी बोलताना ते म्हणाले, मी उद्या महाराष्ट्रात जाणार आहे. इंडिया आघाडीतून निवडणूक लढण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही काही जागांबाबत बोललो आहोत. आमचे दोन आमदार होते. आता आणखी जास्त जागा मिळतील, अशी अपेक्षा आहे.

Akhilesh Yadav
Justice Sanjiv Khanna : सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे उत्तराधिकारी ठरले; कलम 370, निवडणूक रोख्यांसह अनेक महत्वाच्या केसचा दिलाय निकाल

आता अखिलेश यादव स्वत: मुंबईत येणार असल्याने आघाडीवर दबाव असणार आहे. उत्तर प्रदेशात नऊ जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. काँग्रेससोबत त्यांच्या पक्षाची बोलणी सुरू आहेत. त्यामुळे अखिलेश हे महाराष्ट्रात तडजोडीसाठी उत्तर प्रदेशाचा पत्ता बाहेर काढू शकतात. सपाला महाराष्ट्रात काँग्रेसच्या कोट्यातून जागा मिळवण्यासाठी ते प्रयत्न करू शकतात. मात्र, अपेक्षित जागा न मिळाल्यास ते आघाडीतून बाहेर पडणार का, याबाबतही उत्सुकता वाढली आहे. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com