Maharashtra Election : महाराष्ट्रातील कथित मतदार घोटाळ्याबाबत खर्गेंचं मोठं विधान! म्हणाले, चोर कधी ना कधी...

What Is the Maharashtra Assembly Voter Controversy : गुजरातमध्ये काँग्रेसचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनामध्ये बोलताना खर्गे यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा मुद्दा काढला.
Congress President Mallikarjun Kharge addressing on the alleged voter scam in the Maharashtra Assembly elections
Congress President Mallikarjun Kharge addressing on the alleged voter scam in the Maharashtra Assembly elections. Sarkarnama
Published on
Updated on

Assembly Election Voting : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जवळपास सर्वच विरोधी पक्षांनी वाढलेल्या मतदारांच्या संख्येवरून गंभीर आरोप केले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीह लोकसभेतही हा मुद्दा मांडला होता. आता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला आहे.

गुजरातमध्ये काँग्रेसचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनामध्ये बोलताना खर्गे यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा मुद्दा काढला. यावेळी त्यांनी सत्ताधारी मोदी सरकारवरही निशाणा साधला. आज निवडणूक आयोगापासून संसदेपर्यंत सरकारचा विस्तार करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप खर्गेंनी केला.

Congress President Mallikarjun Kharge addressing on the alleged voter scam in the Maharashtra Assembly elections
Mallikarjun Kharge : काम करायचे नसेल तर निवृत्त व्हा! कामचुकार नेत्यांना इशारा देताना खर्गेंनी केली मोठी घोषणा

भाजप महाराष्ट्रात 150 जागा लढते आणि त्यापैकी 138 जागा जिंकते. 90 टक्के निकाल लागतो. असे या देशात कधीच झाले नाही. लोकशाहीला संपवण्यासाठी आणि विरोधकांना हरवण्यासाठी महाराष्ट्रात हा घोटाळा करण्यात आला आहे, असा आरोप खर्गेंनी यावेळी केला.

याबाबत आमचे नेते, वकिलांनी खूप काम केले. पण तितके यश आले नाही. पण जो चोर चोरी करतो, तो कधी ना कधी पकडला जातोच. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे सांगत खर्गे यांनी महाराष्ट्रात घोटाळा झाल्याचे सिध्द करणार असल्याचे एकप्रकारे संकेत दिले आहेत.

Congress President Mallikarjun Kharge addressing on the alleged voter scam in the Maharashtra Assembly elections
Assembly Session : आमदारांमध्ये विधानसभेतच हाणामारी; ‘वक्फ’वरून अधिवेशनात राडा

दरम्यान, खर्गेंनी अधिवेशनामध्ये बोलताना कामचुकार नेते, पदाधिकाऱ्यांचेही कान उपटले आहेत. जे काम करत नाही, जबाबदाऱ्या सांभाळू शकत नाहीत, त्यांनी आता निवृत्त व्हावे, असे विधान त्यांनी केले आहे. त्यांचा रोख नेमका कोणत्या नेत्यांकडे होता, याबाबत आता चर्चांना उधाण आले आहे.

देशभरातील पक्षाच्या जिल्हाध्यक्षांवरही आता मोठी जबाबदारी टाकण्यात आल्याची माहिती खर्गेंनी यावेळी दिली. प्रामुख्याने पक्ष संघटन मजबूत करण्यास उमेदवार निवडीमध्येही जिल्हाध्यक्षांना महत्व प्राप्त होणार आहे. उमेदवार देताना त्यांचा सल्ला घेतला जाणार असल्याचे संकेत खर्गेंनी यावेळी दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com