Karnataka Election: महाराष्ट्र एकीकरण समिती १० वर्षांनंतर प्रथमच बेळगावातील ६ मतदारसंघात निवडणूक लढणार: पाच ठिकाणी उमेदवार जाहीर

Maharashtra Ekikaran Samiti: प्रत्येक मतदारसंघात नवा चेहरा देण्यात आल्याने या वेळी म. ए. समितीच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
Maharashtra Ekikaran Samiti's Candidate
Maharashtra Ekikaran Samiti's CandidateSarkarnama
Published on
Updated on

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीने (Maharashtra Ekikaran Samitee) बेळगाव (Belgaum) जिल्ह्यातील सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवारांची घोषणा केली आहे. केवळ निपाणी मतदारसंघातील उमेदवाराची निवड शिल्लक असून त्याची घोषणा लवकरच होणार आहे. प्रत्येक मतदारसंघात नवा चेहरा देण्यात आल्याने या वेळी म. ए. समितीच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. तब्बल दहा वर्षांनंतर यंदा पहिल्यांदाच समिती सहा मतदारसंघात निवडणूक (Election) लढवित आहे. (Maharashtra Ekikaran Samitee will contest elections in 6 constituencies in Belgaum first time after 10 years)

Maharashtra Ekikaran Samiti's Candidate
Solapur News : माझा शिवसेना प्रवेश सुषमा अंधारेंना उत्तर देण्यासाठी नाही : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर ज्योती वाघमारेंची स्पष्टोक्ती

भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर महाराष्ट्रात जाण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढणाऱ्या म. ए. समितीने १९५७ पासून आतापर्यंत झालेल्या अनेक निवडणुकांमध्ये मोठे यश मिळवले आहे. मात्र, राष्ट्रीय पक्षांनी मराठी भाषिकात पाडलेली फूट व दुहीमुळे अनेक मतदारसंघात ताकद असूनही समितीच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे, पुन्हा एकदा समितीला बळ मिळावे आणि ताकद वाढावी यासाठी मध्यवर्ती म. ए. समितीने गेल्या सहा महिन्यात अनेक कार्यक्रम हाती घेतले आहेत.

Maharashtra Ekikaran Samiti's Candidate
Mangalveda Politic's : ‘प्रशांतराव, तुम्ही म्हणताय म्हणून ढोबळे भाजपत आहेत; पण आम्हाला तसं..’ : साळुंखेंनी ठेवले ढोबळेंच्या दुःखावर बोट

बायपास, रिंगरोडमुळे शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाबाबत जोरदार आवाज उठवला आहे. त्यामुळे, गेल्या काही महिन्यात मराठी भाषिक जनता संघटीत झाली आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रत्येक मतदारसंघात एकच उमेदवार द्यावा, अशी मागणी लावून धरण्यात आली. त्यानुसार मध्यवर्ती समितीच्या सूचनेला प्रतिसाद देत घटक समित्यांनी आपापल्या मतदारसंघात एकच उमेदवाराची घोषणा केली आहे.

बेळगाव ग्रामीणमधून युवा नेते आर. एम. चौगुले, बेळगाव दक्षिणमधून रमाकांत कोंडुसकर, उत्तरमधून ॲड. अमर येळ्ळूरकर, खानापूरमधून मुरलीधर पाटील, तर यमकनमर्डीतून मारुती नाईक या माजी सैनिकाला उमेदवारी देण्यात आली आहे. निपाणी मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा लवकरच केली जाणार आहे. त्यामुळे, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Maharashtra Ekikaran Samiti's Candidate
Atique Ahmed news : हल्ल्यापूर्वी अतिकने सांगितली १४ जणांची नावे : पाकिस्तानमधून शस्त्रे पुरविणारी 'ती' व्यक्ती कोण?

म. ए. समिती संपली असे सांगत समिती सोडून गेलेल्या अनेक कार्यकर्त्यांनाही ही ताकद दिसून येत आहे. त्यामुळे, समितीच्या झेंड्याखाली सर्वजण एकत्र येत आहेत. त्यामुळे यावेळची निवडणूक समितीसाठी सकारात्मक ठरण्याची चिन्हे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com