
Jagdeep Dhankhar Resignation News: जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी सोमवारी उपराष्ट्रपती पदाचा (Vice President) राजीनामा दिल्यानंतर देशाचे नवे उपराष्ट्रपती कोण होणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. या पदासाठी दोन नावे शर्यतीत आघाडीवर आहे. महाराष्ट्रातील एका नेत्याचे नाव चर्चेत आहे.
आपल्या प्रकृतीचे कारण देत जगदीश धनखड यांनी सोमवारी राजीनामा दिला. संसदेचे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जगदीश धनखड यांनी अचानक राजीनामा दिल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या जागी कोण विराजमान होईल याची चर्चा सुरु झाली आहे.
उपराष्ट्रपती निवडण्यासाठी भाजपकडे यंत्रणा आहे. पक्षातील अनुभवी नेता, केंद्रीय मंत्री किंवा राज्यपालांपैकी एकाची या पदावर नियुक्ती केली जाऊ शकते. जगदीप धनखड हे उपराष्ट्रपती होण्याआधी पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. राष्ट्रपति द्रोपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे.
जगदीश धनखड यांच्या राजीनाम्यानंतर आता राज्यसभा सभापतींच्या खूर्चीवर कोण विराजमान होणार याची चर्चा सुरु आहे. नवीन उपराष्ट्रपती निवडीची प्रक्रिया सुरु होणार आहे. आता राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह हे राज्यसभेचे प्रभारी सभापती म्हणून काम पाहणार आहेत. सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात ते कार्यभार सांभाळतील.
राज्यघटनेनुसार उपराष्ट्रपती पद 60 दिवस रिक्त असू शकते. 60 दिवसाच्या आत निवडणूक घेणे आवश्यक असते. याचा अर्थ 19 सप्टेंबर 2025 पर्यंत ही निवड प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे आहे. केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच उपराष्ट्रपती पदाची नि़वडणूक जाहीर करणार असल्याची माहिती आहे.लोकसभेचे 543 खासदार, राज्यसभेचे 245 खासदार यांच्यासह 788 मतदार या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार आहे. यासाठी गुप्त पद्धतीने मतदान केले जाते.
नवीन उपराष्ट्रपदीपदाच्या उमेदवाराबाबत नावांची चर्चा सुरु आहे. एनडीएच्या दोन्ही सभागृहात बहुमत आहे. तर दुसरीकडे विरोधक इंडिया आघाडी सक्षम उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवू शकते. 19 सप्टेंबरपर्यंत देशाला नवे उपराष्ट्रपती मिळतील, हे मात्र निश्चित.
कोण आहे शर्यतीत संभाव्य नावामध्ये महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राजस्थानचे (Rajasthan) राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे नाव आघाडीवर आहे. बागडे यांची या पदासाठी निवड झाली तर ते या पदावर पोहचणारे ते पहिले महाराष्ट्रीयन असतील. जनता दल (यूनाइटेड)चे खासदार आणि राज्यसभेचे उपसभापति हरिवंश हे संभावित उमेदवार असू शकतात. कारण ते 2020 पासून या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्यावर मोदी सरकारचा विश्वास आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.