Maharashtra politics : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर होणारी आजची सुनावणी पुन्हा लांबणीवर!

Maharashtra politics : पुढील सुनावणी कधी हे अजूनही स्पष्ट नाही.
supreme court Latest News
supreme court Latest NewsSarkarnama

Maharashtra politics : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणाची (Maharashtra Political Crisis) सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होती. मात्र आता पुन्हा एकदा ही सुनावणी लांबणीवर गेली आहे. घटनापीठातीली पाच न्यायमूर्तींपैकी असलेले, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी हे आज उपलब्ध होणार नाहीत. यामुळे आज पार पडणारी सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे. राज्यातील सत्तासंघर्षावर पुढील सुनावणी कधी होणार हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.

मागील सुनावणीच्या वेळेस न्यायालयीन घटनापीठाने दोन्ही पक्षकारांना म्हणजेच दोन्ही गटांना आपली बाजू लेखी स्वरूपात सादर करण्यास सांगितले होत. यासाठी न्यायालयाने दोन्ही गटांना तीन आठवडेपर्यंतची मुदत दिली गेली होती. आज न्यायालयाच्या सुनावणीत ठाकेर आणि शिंदे आणि फडणवीस सरकारच्या बाबतीत काही ठोस निर्णय येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, मात्र आता सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर गेली आहे. पुढील सुनावणी कधी हे ही स्पष्ट निर्णायक ठरण्याची शक्यता होती. मात्र, ही सुनावणी लांबणीवर गेल्यानं याबाबत कधी निर्णय लागणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

supreme court Latest News
Nitin Gadkari : रोडकरी नंतर आता नितीन गडकरी झाले स्पायडरमॅन !

राज्यातील सत्तासंघर्षावर आणि शिवसेना पक्षफुटीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाकडे आज सुनावणी पार पडणार होती. सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमुर्ती हिमा कोहली, आणि न्यायमुर्ती, पी. एस. नरसिंहा यांच्या घटनापुढे सुनावणी प्रस्थावित आहे. मात्र न्यायमूर्ती कृष्ण मुरारी उपलब्ध नसल्याने सुनावणी पुढे ढकलली गेली आहे.

supreme court Latest News
डिगडोह नगर परिषद करण्यासाठी लोकप्रतिनिधी देणार राजीनामे, आमदार मेघेंची घेतली भेट...

शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांनी शिंदे - फडणवीस सरकारला आव्हान दिले असून, त्यांना सरकार स्थापनेचा राज्यपालांनी घेतलेला निर्णय आणि विधानसभा अध्यक्षांची निवड रद्द करण्यात यावे, अशी मागणी देसाईंनी केली आहे. शिवसेनेतून फुटून दुसरा गट बनवणाऱ्या आमदारांना अपात्र बनवण्याची मागणी देसाई आणि ठाकरे गटाचे प्रतोद सुनिल प्रभू यांनी केली आहे. आता मात्र पुढील सुनावणी कधी होणार हे स्पष्ट नसल्याने, यावर कधी पर्यंत निर्णय होणार, याची प्रतीक्षा ठाकरे गट करत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com